liquor license scam Chandrapur
पप्पू देशमुख यांनी 177 पानांचे पुरावे देत SIT कडे केली तक्रार; धार्मिक स्थळे, शाळा जवळ अनधिकृत दुकानांना परवाने – नागरिकांना तक्रारीसाठी पुन्हा एक संधी
liquor license scam Chandrapur चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदी हटवल्यानंतर नवीन दारू दुकान वाटप व जुन्या दारू दुकानांचे स्थलांतरण करताना अनेक प्रकरणात अनियमितता आढळल्याने शासनाने चौकशीसाठी एसआयटी ची स्थापना केली. जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिनांक 8 एप्रिल रोजी एसआयटी ला 177 पानांची पुराव्यासह तक्रार केली. SIT investigation liquor license Maharashtra
आपले सरकार पोर्टल ५ दिवस बंद राहणार
जुन्या दारू दुकानाचे स्थलांतरण करताना किंवा नवीन दुकानाला मंजुरी देताना सदर इमारत किंवा गाळ्याचे बांधकाम अधिकृत असणे गरजेचे आहे. मंजुरी देण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सक्षम अधिकाऱ्याने मौका चौकशी करून तसा अहवाल उत्पादन शुल्क विभागाला देणे गरजेचे असताना चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील एकाही दुकानासाठी अशा प्रकारचा अहवाल घेण्यात आला नाही. माजी नगरसेवक देशमुख यांच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त यांनी उत्पादन शुल्क विभागाला पत्र सुद्धा दिले होते. Chandrapur liquor permit irregularities
याच्या पुराव्याखातर नागपूर रोडवरील देशी दारू दुकान, दाताळा रोडवरील देशी दारू दुकान अशा काही दुकानांच्या मंजुरीच्या सर्व कागदपत्रांची प्रत जन विकास सेनेने एसआटी ला दिली.
जैन मंदिराच्या मागे असलेल्या केबी बियर शॉपी चे अंतर मंदिराच्या प्रवेशद्वारापासून केवळ 30 मीटरवर आहे. परंतु तालुका भूमी अभिलेख कार्यालयाने हे अंतर 50 मीटर असल्याचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिला. रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या दोन्ही बाजूला लागून शाळा असताना या ठिकाणी पोलीस विभागाने चुकीचे अहवाल दिले.
दारू दुकानांचे वाटप व स्थलांतरण करताना 18 ते 20 कोटी रुपयांचे देवाण-घेवाण झाल्याचा व यामध्ये महसूल विभाग, पोलीस विभाग तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी सामील असल्याचा लेखी आरोप देशमुख यांनी दिनांक 5 जुलै 2022 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे महासंचालक व चंद्रपूर जिल्ह्याचे उपअधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने 10 नोव्हेंबर 2022 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने देशमुख यांचे बयान नोंदवून पुराव्यासह संपूर्ण अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला होता. Maharashtra ACB liquor license scam

याबाबत जनविकासनेने उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन मंत्री शंभूराजे देसाई, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर व आयुक्त विजय सूर्यवंशी यांना सुद्धा मार्च 2023 मध्ये लेखी तक्रार केली होती. तक्रारीमध्ये नागपूर रोडवरील महालक्ष्मी टावर,दाताळा रोडवरील प्रवीण जुमडे यांच्या इमारतीमधील ,श्रीकृष्ण टॉकीज जवळील कॉम्प्लेक्स मध्ये तसेच नागवी येथील वैभव पिसे यांच्या घरी असलेले देशी दारू दुकान, जैन मंदिर ला लागून असलेली केबी बियर शॉपी, रघुवंशी कॉम्प्लेक्समधील परमिट रूम इत्यादी दारू दुकानांचा समावेश आहे.
तक्रार करण्यासाठी तारखेची मर्यादा नाही
नागरिकांनी चंद्रपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार करावी
नागरिकांच्या प्रत्यक्ष तक्रारी स्वीकारण्यासाठी एसआयटी पथक 7 व 8 एप्रिल रोजी चंद्रपूरला आले होते. यावरून केवळ 7 व 8 एप्रिल ला तक्रारी स्वीकारण्यात येतील असा संभ्रम निर्माण झाला. पप्पू देशमुख यांनी याबाबत एसआयटी पथकाचे प्रमुख संदीप दिवाण यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तेव्हा एसआयटी पथक गेल्यानंतरही चंद्रपूरच्या कार्यालयामार्फत नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यात येतील अशी माहिती एसआयटी प्रमुख दिवाण यांनी दिली. चुकीच्या ठिकाणी दारू दुकानांना मंजूरी दिली असल्यास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने चंद्रपूरच्या कार्यालयामार्फत एसआयटी ला पुराव्यासह तक्रारी कराव्या असे आवाहन देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. पत्रकार परिषदेला जनविकास सेनेचे इमदाद शेख, अक्षय येरगुडे, मनीषा बोबडे, प्रफुल बैरम सुभाष पाचभाई, अमुल रामटेके,देवराव हटवार, सतीश घोडमारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.