Mahakali Yatra 2025 Chandrapur
Mahakali Yatra 2025 Chandrapur : देवी महाकाली यात्रेस 3 एप्रिलपासून सुरवात होत असतांना राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व चंद्रपूर मनपा प्रशासनाद्वारे तयारी पुर्ण करण्यात आली असुन महाकाली मंदिर परिसराला यात्रा नगरीचे स्वरूप आले आहे. Devi Mahakali Festival Preparations
ताडोबा सफारीसाठी आता थेट क्रुझर सेवा
प्रशासनाद्वारे महाकाली मंदिरासमोरून बैल बाजार परिसरात जाणारा रस्ता हा अतिशय अरुंद असल्याने स्वस्तिक ग्लास फॅक्टरी जवळुन माता महाकाली नगरीपर्यंत मोठा मार्ग बनविण्यात आला आहे. बैलबाजार भागात पटांगणाची पूर्णतः सफाई व सपाटीकरण करून याच भागात भाविकांना निवासासाठी 4 मोठे मांडव उभारण्यात आले आहे तसेच मंदिर संस्थेची निवास व्यवस्था व सशुल्क निवास व्यवस्था सुद्धा यात्रा मैदानात उपलब्ध आहे. Mahakali Yatra 2025 Chandrapur
भाविकांना पिण्यासाठी 12 ठिकाणी 2 हजार लिटरची क्षमता असलेल्या 20 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असुन भूमिगत पाईप टाकुन पाण्याचे नळ उभारण्यात येऊन पाण्याचे टँकरसुद्धा सज्ज ठेवण्यात येत आहे. भाविकांना त्यांची वाहने ठेवण्यास त्यांच्या येण्याच्या मार्गापासुन जवळ असेल असे 5 वाहन तळ निश्चित करण्यात आले आहेत. Mahakali Temple Yatra Arrangements
यात्रा मैदान येथे व मनपा स्वच्छता झोन इमारत अश्या 2 जागी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असुन यात्रा मैदान येथे 33 पक्के शौचालय तर 5 ठिकाणी फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.मनपा स्वच्छता झोन इमारत व यात्रा मैदान नियंत्रण कक्षाजवळ निःशुल्क प्रथोमपचार वैद्यकीय सेवा तसेच 24 तास रुग्णवाहिका व अग्निशमन सेवा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात विदयुत व्यवस्था उभारली गेली असुन वादळ,वारा,पाऊस अशी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास नागरीकांना स्थलांतरीत करण्याकरीता मनपाच्या शाळा व इतर ठिकाणे मिळुन 18 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
ट्रॅफीक पोलीस विभागातर्फे अंचलेश्वर दरवाजा ते बागला चौक परीसर हा नो पार्कींग झोन व नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आला असल्याने येथे वाहने व दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.यात्रा परीसरावर विविध ठिकाणी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलीस विभाग लक्ष ठेऊन असणार आहे. Mahakali Yatra Traffic Rules 2025

कपडे बदलण्यासाठी एकूण 40 खोल्यांची व्यवस्था झरपट नदी,अंचलेश्वर गेट जवळ करण्यात आली असुन जवळचे आंघोळीसाठी खोल्यांची व्यवस्थाही आहे. दुकानदार,पथविक्रेते,बर्फीविक्रेते यांच्यासाठी सुद्धा यात्रा मैदानात दुकाने निश्चित करून दिली असुन मनोरंजनाची दुकाने सुद्धा उपलब्ध असणार आहेत. तसेच चहाच्या दुकानांसाठी मैदानात मंदिर संस्थेच्या निवास व्यवस्थेजवळ जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. Chandrapur Police Yatra Security
यात्रेकरू महिलांसाठी हिरकणी कक्ष यात्रा मैदान (नियंत्रण कक्षा लगत) उभारण्यात आले असुन मदतीसाठी दुरध्वनी क्रमांक सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत. प्रशासनाद्वारे दिल्या जात असणाऱ्या या सर्व सुविधांची माहिती ही पत्रकाद्वारे देण्यात आली असुन सदर पत्रके सर्व यात्रा परिसरातील सेवा केंद्रांवर उपलब्ध आहेत. Mahakali Temple Yatra Arrangements
- अशी राहील पार्किंग व्यवस्था –
1) मुल रोड कडून येण्याऱ्या यात्रेकरूंसाठी – सिद्धार्थ स्पोर्टिंग क्लब ग्राउंड, नायरा पेट्रोल पंपाजवळ, बायपास रोड
2) बल्लारपूर रोड कडून येण्याऱ्या यात्रेकरूंसाठी – डी.एड. कॉलेज ग्राउंड, चंद्रपूर
3) सर्व यात्रेकरूंसाठी – कोहिनूर स्टेडियम (कोनेरी तलाब ग्राउंड), दादमहाल वार्ड, जेल रोड
4) सर्व यात्रेकरूंसाठी – यात्रा मैदान, रेल्वे लाईनजवळ, चंद्रपूर
5) नागपूर रोडतर्फे येण्याऱ्या यात्रेकरूंसाठी – न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंड, चांदा क्लब ग्राउंड समोर, वरोरा नाका. Mahakali Pilgrimage Parking 2025
येथे असणार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था –
1) बागला चौक
2) अंचलेश्वर गेट बस स्टैंड
3) महाकाली गेट च्या समोर
4) यात्रा मैदान
5) जटपूरा गेट
6) चांदा क्लब ग्राउंड जवळ
7) अंचलेश्वर गेट
8) गुरुमाउली मंदिर जवळ
9) बागला चौक
10) मंदिर जवळील पेट्रोल पंप जवळ
11) कोहिनूर तलाव
12) महाकाली टाकी खाली
येथे असणार मदतीसाठी नियंत्रण कक्ष –
1) यात्रा मैदान 2) मनपा सफाई झोन इमारत, माता महाकाली मंदिराच्या बाजूला - शौचालयांची व्यवस्था :
1) यात्रा मैदान
फिरते शौचालय :
1) यात्रा मैदान
2) अंचलेश्वर गेट
3) कोहिनुर ग्राउंड
4) माचीस कारखाना
5) दानव वाडी
आरोग्य सुविधा :
1) मनपा सफाई झोन इमारत, माता महाकाली मंदिराच्या बाजूला
2) यात्रा मैदान (नियंत्रण कक्षा लगत)
आंघोळ व कपडे बदलण्याची व्यवस्था :
1) झरपट नदी, अंचलेश्वर गेट जवळ
निवास व्यवस्था :
1) मांडव क्र.१ – यात्रा मैदान
2) मांडव क्र.२ – यात्रा मैदान
3) मांडव क्र.३ – यात्रा मैदान
4) मांडव क्र.४ – यात्रा मैदान
5) मंदिर संस्थेची निवास व्यवस्था – यात्रा मैदान
६) सशुल्क निवास व्यव्यस्था यात्रा मैदान - आपत्कालीन निवास व्यवस्था (वादळ, वारे, पाऊस आल्यास) –
1) गुरु माऊली देवस्थान, महाकाली वार्ड
2) मार्कंडेय मंदिर, महाकाली वार्ड
3) राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, बाबुपेठ
4) महादेव मंदिर, बाबुपेठ
5) बालाजी मंदिर, बाबुपेठ
6) संत रविदास हॉल, अंचलेश्वर वार्ड
7) बागला हायस्कूल, बागला चौक भिवापूर
8) महाकाली कन्या शाळा, महाकाली वार्ड
9) खालसा कॉन्व्हेंट, महाकाली वार्ड
10) पटेल हायस्कूल, गिरनार चौक चंद्रपूर
11) संताजी सभागृह, भानापेठ वार्ड
12) सरदार पटेल महाविद्यालय, गंजवार्ड चंद्रपूर
13) तिरुमला हॉल, भिवापूर वॉर्ड
14) सिटी हायस्कूल,बाबुपेठ
15) एफईएस गर्ल्स कॉलेज अंचलेश्वर गेट जवळ
16) सरस्वती विद्यालय,भिवापूर
17) शहिद भगतसिंग मनपा शाळा
18) सावित्रीबाई फुले शाळा नेताजी चौक बाबुपेठ - यात्रेतील दुकाने –
दुकानदारांसाठी दुकाने लावण्यासाठी जागा – यात्रा मैदान
पथविक्रेतेसाठी दुकाने लावण्यासाठी जागा – यात्रा मैदान
बर्फीच्या दुकानांसाठी जागा : यात्रा मैदान
मनोरंजनाची दुकाने : यात्रा मैदान (पार्किंग क्र. 1 च्या बाजूला)
यात्रेकरूकरिता सशुल्क खाद्यपदार्थ व शीतपेय व्यवस्था – यात्रा मैदान (नियंत्रण कक्षा लगत)
चहाची दुकाने – मंदिर संस्थेची निवास व्यवस्था जवळ (यात्रा मैदान)
हिरकणी कक्ष –
१) यात्रेकरू महिलांसाठी हिरकणी कक्ष: यात्रा मैदान (नियंत्रण कक्षा लगत)
अग्निशमन व रुग्णवाहिका क्षेत्र –
1) मनपा सफाई झोन इमारत, माता महाकाली मंदिराच्या बाजूला 2)नियंत्रण कक्ष (यात्रा मैदान)
मदतीसाठी संपर्क –
1) मनपा व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रं – 8530006063
2) मनपा टोल फ्री क्रं -18002574010
3) जिल्हाधिकारी कार्यालय, हॅलो चांदा टोल फ्री क्रं.- 155 398
4) पोलिस विभाग टोल फ्री हेल्प लाईन – 112
5) रुग्णवाहिका- 108
6) मनपा अग्निशमन दल – 07172 – 254614/101
7) पोलिस नियंत्रण कक्ष – 07172-252200
8) पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर – 7887891001
9) महिला हेल्प लाईन क्रं.- 1091
10) चाईल्ड हेल्प लाईन क्रं.- 1098