MNS demands Marathi in banks । मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही – मनोज तांबेकर यांचा इशारा

MNS demands Marathi in banks

चंद्रपूरातील सर्व बँकांना मराठीसाठी निवेदन – मनसेचा निर्णायक इशारा

MNS demands Marathi in banks : चंद्रपूर | चंद्रपूर शहरातील सर्व बँकांमध्ये मराठी भाषा वापरणे सक्तीचे करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिला आहे. मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने शहरातील विविध बँकांना मराठी भाषेच्या वापराबाबत निवेदन सादर केले. Marathi language usage in banks

चंद्रपुरात ७० रुपयांच्या पेट्रोल वरून वाद

या निवेदनात नमूद करण्यात आले की, महाराष्ट्रात राहून मराठी भाषा न बोलणं ही मराठी जनतेचा आणि भाषेचा थेट अपमान आहे. अनेक बँकांमध्ये आजही परप्रांतीय कर्मचारी कार्यरत असून, त्यांना मराठी येऊनही ते मुद्दामहून मराठी भाषा टाळतात. याचा फटका मुख्यतः सर्वसामान्य ग्राहकांना – विशेषतः मजूर आणि ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना – बसतो. अशा ग्राहकांना हिंदी येत नसल्याने त्यांना बँकिंग व्यवहार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा तर बँकेचे कर्मचारी उद्धटपणे “मुझे मराठी आती नही, तुमको हिंदी आती है तो बात करो” अशा स्वरूपाचे अपमानास्पद वक्तव्य करतात.

मनसेच्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक बँक कर्मचाऱ्याला मराठी भाषा अवगत असणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांना मराठी येत नाही त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी स्पष्ट मागणीही मनसेने केली आहे. मराठी भाषेचा अवमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच सहन करणार नाही, असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला. Manoj Tambekar bank language protest

निवेदन देताना मनसेचे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्यासह जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, राज वर्मा, संदीप पटेल, महिला आघाडीच्या वर्षा ताई भोमले, मंदा ताई कहाडे, शिवराज चौहान आणि इतर मनसैनिक उपस्थित होते.

मनसेने स्पष्टपणे सांगितले आहे की, जर बँकांनी मराठी भाषेचा वापर वाढवला नाही, तर लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!