Moharli range tiger death news । चंद्रपूरमध्ये पुन्हा वाघाचा मृतदेह – मोहर्ली जंगलात खळबळ!

Moharli range tiger death news

Chandrapur जिल्ह्यातील Moharli range tiger death news पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, कारण इरई धरण परिसरात आढळलेल्या वाघाच्या कुजलेल्या मृतदेहामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. Forest patrol दरम्यान सापडलेला हा मृत वाघ अंदाजे १५-२० दिवसांपूर्वी मृत झाला असावा, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या वर्षात आतापर्यंत Chandrapur district मध्ये 8 tiger deaths नोंदवण्यात आल्या असून, यामुळे Wildlife conservation बाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

DNA test for tiger identification साठी मृत वाघाचे नमुने CCMB Hyderabad येथे पाठवण्यात आले असून, सदर वाघीण T-24 असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Forest fire wildlife deaths किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे ही घटना घडली का, याचा तपास सुरु आहे. Tiger poaching investigation India या पार्श्वभूमीवर देखील संबंधित यंत्रणा तपास करत आहेत.

Moharli range tiger death news : चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे, वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने वनविभागाने मृत वाघाची ओळख पटविण्यासाठी DNA हैद्राबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. चालू वर्षात आतापर्यंत एकूण ८ वाघांचा मृत्यू झाला आहे.

थोर नेत्यांचे विचार आता अभ्यासक्रमात, खासदार धानोरकर यांची मोठी मागणी

मोहर्ली वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र सीताराम पेठ अंतर्गत येत असलेल्या भामडेळी गावालगत १४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास इरई धरण परिसरात गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना सदर वाघाचा मृतदेह आढळून आला. Tiger carcass found near Irai Dam

याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्यावर वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सदर वाघ हा वयस्क असून त्याचा मृत्यू १५ ते २० दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज लगावण्यात आला आहे. ३१ मार्च रोजी परिसरातील शेतकऱ्याने शेतातील पुंजने जाळण्यासाठी लावलेल्या आगीमध्ये गवताळ भाग जळालेला होता या आगीत वाघाचा मृतदेह अर्धवट जळालेला असून वाघाचे नखे, दात व हाडे शाबूत आहे. मृतदेहाचे मास सडलेल्या व अळ्यायुक्त होते, या आगीत मृतदेहाला लागलेल्या अळ्या सुद्धा जळून खाक झाल्या. Tadoba tiger reserve incident

पशु वैद्यकीय अधिकारी यांनी वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नमुने गोळा केले वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी DNA सॅम्पल घेण्यात आले असून पुढील तपासणी साठी CCMB हैद्राबाद येथे पाठविण्यात येणार आहे. यावेळी संकेत वाठोरे, वन्यजीव सल्लागार सदस्य धनंजय बापट, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण प्रतिनिधी बंडू धोत्रे, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रतिनिधी मुकेश भांदक्कर, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ कुंदन पौडचेलवार आदींची उपस्थिती होती.

याच परिसरात १६ मार्चपर्यंत नियमितपणे T-२४ व तिचे बछडे दिसून येत होते, बछडे २ वर्षाचे झाल्याने ते वाघिणीपासून स्वतंत्र झाले होते, वाघीण दिसून न आल्याने तिचा शोध सुरु होता, मृत वाघ हि T-२४ वाघीण असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकाराची संतोष थिपे करीत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!