OBC reservation protest India । “दिल्लीत ओबीसींचा लढा: जंतर-मंतरवर हजारोंची हुंकार!”

OBC reservation protest India

“मोदींना रेड्डींचा टोमणा: 10 वर्षांत ओबीसींसाठी काय केलं?”


OBC reservation protest India : नवी दिल्ली: बीसी वेल्फेअर असोसिएशन तेलंगणा व आंध्र प्रदेश आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल 2025 रोजी जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे ओबीसी आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी विराट धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात देशभरातील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

परदेशात शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे हफ्ते रखडले

प्रमुख मागण्या:

  • जातनिहाय जनगणना करावी.
  • केंद्रात ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे. OBC ministry formation
  • आरक्षणाची 50% मर्यादा हटवावी.
  • क्रिमिलियरची उत्पन्न मर्यादा 15 लाख रुपये करावी. creamy layer income limit
  • तेलंगणातील वाढवलेले 42 टक्के ओबीसींचे आरक्षण 9 व्या अनुसूचीमध्ये टाकावे.
  • संविधानाच्या कलम 243 डी (6) व 243 टी (6) मध्ये सुधारणा करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षणाचा कायदा करावा.
  • मंडल आयोग व स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात.
  • शेतमजूर व शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. farmers pension scheme India
  • महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना संयुक्त भारतरत्न द्यावा.
  • ओबीसींसाठी लोकसभा व विधानसभा असे स्वतंत्र मतदार क्षेत्र स्थापन करावे.
  • केंद्र सरकारने वार्षिक अंदाजे बजेट तयार करताना एससी, एसटी प्रमाणे ओबीसींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी.
  • 2014 पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्रशासकीय सेवा परीक्षा पास करणाऱ्या परंतु नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असताना त्याचा चुकीचा अर्थ लावून डीओपीटीने आयएएस होण्यापासून वंचित ठेवलेल्या 314 हून अधिक विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त करावे.

आंदोलनातील प्रमुख नेते:

  • तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी.
  • बीसी वेल्फेअरचे अध्यक्ष श्रीनिवास जाजुला.
  • राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे.
  • खासदार असोदिन ओवेसी.
  • खासदार सुप्रिया सुळे.
  • नरेंद्र पटेल, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर ,श्याम कुमार बर्वे,प्रणिती शिंदे,खासदार कन्निमोडी , संसद विल्सन, संसद मनोज कुमार झा,पूर्व संसद हनुमंत आप्पा रेड्डी, कुमारी शैलजा,खासदार , पंजाब काँग्रेस प्रेसिडेंट अमरेंद्र सिंग राजा, सिने अभिनेता सुमन , सिने अभिनेत्री विजयंती.
  • तेलंगणातील लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार.
  • राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर.
  • राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी इंद्रजीत सिंग, प्रकाश साबळे , प्रकाश भगरथ,महेंद्र ब्राह्मणवाडे, शिवप्रसाद शाहू , सतपाल सोखी , विक्रम गौड, मुकेश पुडके.
  • आंध्रप्रदेशचे अध्यक्ष शंकर अण्णा, क्रांती कुमार श्याम अण्णा.

मुख्यमंत्र्यांचे भाषण:

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आंदोलनात बोलताना सांगितले की, “आता हे आंदोलन देशव्यापी करण्यात येईल. पंतप्रधान मी ओबीसी आहे म्हणतात, परंतु 10 वर्षांपासून एकही योजना आणली नाही.” विविध माग्न्यनसाठी केलेल्या या आंदोलनात देशभरातून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!