Panchmukhi Hanuman Temple Development News
पंचमुखी हनुमान मंदिराच्या विकासास चालना देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयामुळे स्थानिक जनता आणि भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. Panchmukhi Hanuman Temple Development News अंतर्गत, आमदार किशोर जोरगेवार यांनी मंदिर परिसरासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पात भक्तनिवास, सौंदर्यीकरण, आणि भाविकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. पवित्रतेसह पर्यटनाला चालना देणारा हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक मोठे पाऊल ठरणार आहे.
Panchmukhi Hanuman Temple Development News : पवनसुत हनुमान म्हणजे निस्वार्थ सेवा, पराक्रम आणि भक्ती यांचे प्रतीक. हा देश नेहमीच सेवाभावी लोकांना स्मरणात ठेवतो. म्हणूनच भारतभर सर्वाधिक मंदिरे हनुमानाचे आहेत. हनुमानांसारखा सेवक होणे हे अत्यंत कठीण, पण प्रेरणादायक आहे. येथून समाजसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी या संपूर्ण मंदिर परिसराचा विकास २५ कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यातील पहिल्या टप्प्यातील पाच कोटी रुपये याच आर्थिक वर्षात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. hanuman temple development
आदिवासी विद्यार्थ्यांचे उन्हाळी शिबीर सुरु
पंचमुखी पांढरकवडा हनुमान मंदिर येथील भक्तनिवासाच्या कामाचे शासकीय लोकार्पण रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सरपंच सुरज तोतडे, उपसरपंच समीर भिवापूरे, मंदिर देवस्थानचे लक्ष्मण सदलावर, कोषाध्यक्ष बाबूराव कुकडे, भाजपचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, रघुवीर अहिर, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, बलराम डोडाणी, संजय तिवारी, माजी नगरसेविका छबू वैरागडे, मनोज पाल, वंदना हातगावकर, सविता दंढारे, संतोष नुने, मंदिर समितीचे विश्वस्त सहदेव कोल्हे, आशिष मासिरकर, ईमारान खान उपसरपंच विनोद खवले, प्रज्ञा बोरगमवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आज पांढरकवडा येथील पंचमुखी हे पवित्र व ऐतिहासिक हणुमान मंदिर केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र ठरत आहे. येथे भक्तनिवास, परिसर सौंदर्यीकरण, भाविकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार असून, मंदिर परिसराचा समग्र विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. आपण घुग्घूसला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिल्यानंतर येथील विकासाला गती मिळाली आहे. उड्डाणपूल, ग्रामीण रुग्णालय, व इतर मूलभूत सुविधा आता अंतिम टप्प्यात आहेत, असेही आमदार जोरगेवार म्हणाले. kishor jorgewar news

पांढरकडा गावाजवळून जाणारा प्रस्तावित समृद्धी महामार्ग चंद्रपूरच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरेल. मुंबईहून चंद्रपूरला येणाऱ्या पर्यटकांना शहरात प्रवेश करताना पंचमुखी हणुमान मंदिरासमोरूनच यावे लागेल. त्यामुळे या परिसराचे सुशोभीकरण व पर्यटन केंद्र म्हणून विकास करणे ही वेळेची गरज आहे. हे मंदिर सध्या ‘क’ दर्जात असून त्यास ‘ब’ दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले सेवा हीच खरी श्रद्धा आहे. ही सेवा आपल्याला यश, समृद्धी आणि एकतेच्या दिशेने घेऊन जाते. असेही ते यावेळी म्हणाले. या लोकार्पण सोहळ्याला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. परिसरात उत्साही वातावरण पाहायला मिळाले.