petrol pump fraud chandrapur
petrol pump fraud chandrapur : चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील वासेकर पेट्रोल पंपावर ग्राहकाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घुटकाला वॉर्डातील भारत मुधोळकर यांनी 70 रुपयांचे पेट्रोल टाकले, मात्र 100 मीटरवरच त्यांची दुचाकी बंद पडली. या घटनेमुळे पंपावर एकच गोंधळ उडाला. 70 rupees petrol
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात ९ वा बळी
मिळालेल्या माहितीनुसार, भारत मुधोळकर हे सकाळी रामनगर येथील सेंट मायकल शाळेत गेले होते. त्यांच्या मोपेडमध्ये (क्रमांक एमएच 34 एजे 7611) पेट्रोल कमी असल्याने त्यांनी शाळेजवळच्या वासेकर पेट्रोल पंपावर 70 रुपयांचे पेट्रोल टाकले. त्यानंतर ते घरी निघाले असता सेंट मायकल शाळेजवळच त्यांची दुचाकी बंद पडली.
भारतने दुचाकी तपासली असता त्यात पेट्रोलचा एक थेंबही नव्हता. त्यांनी तातडीने पेट्रोल पंपावर जाऊन कर्मचाऱ्यांना जाब विचारला. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर कर्मचाऱ्यांनी 500 रुपयांचे पेट्रोल टाकण्याचे आमिष दाखवले, मात्र भारतने कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा आरोप केला. petrol pump customer rights
पंपावरील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल टाकल्याचे सांगितले, मात्र पेट्रोल वाहनात आले की नाही, याबाबत ते मूग गिळून बसले. यापूर्वीही वासेकर पेट्रोल पंपावर असे प्रकार घडल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पंपावरील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्येही फेरफार केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल भरताना सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.