Pratibha Dhanorkar news
Pratibha Dhanorkar news : लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच खासदार प्रतिभा धानोरकर या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढे आल्या असून त्यांच्या माध्यमातून आज दि. 07 एप्रिल रोजी वरोरा येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रपूर बस स्थानकावर शिवाई बसने चिरडला ऑटो चालकाचा पाय
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनतेच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे मत वरोरा येथील आयोजीत जनता दरबाराच्या वेळीस केले. अर्थ संकल्पीय अधिवेशनात आपल्या लोकसभेतील अनेक प्रश्नांचा पाढा केंद्र सरकार समोर वाचून आता त्या पुन्हा एकदा जनसेवेत रुजू झाल्या आहेत.
वरोरा येथे आयोजित जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्यासंदर्भात त्यांनी निराकरण केले. अनेक नागरिकांनी आज आयोजित जनता दरबारात लेखी निवेदनासह खासदार धानोरकर यांच्याकडे समस्या मांडल्या. या संदर्भात खासदार धानोरकर यांनी अनेक समस्यांच्या निराकरणासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून नागरीकांच्या समस्या सोडविल्या.
यावेळी, खासदार धानोरकरांनी प्रत्येक नागरीकांची समस्या ही माझ्याकडून सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न केले जाईल अशे आश्वासित मत व्यक्त केले. येणाऱ्या काळात प्रत्येक तालुक्यात तसेच, जिल्हा परिषद क्षेत्रात जनता दरबाराचे आयोजन करुन नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.