pregnancy weight monitoring । “चंद्रपूर जिल्ह्यात २५,००० कुटुंबांमध्ये होणार आरोग्याची मोहीम – ‘वेट स्टिकर’चा नवा प्रयोग”

pregnancy weight monitoring

pregnancy weight monitoring : जिल्ह्यातील माता मृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने नाविन्यपूर्ण  “वेट स्टिकर “योजना उपक्रम मा. विवेक जॉनसन , मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.चंद्रपूर यांचे विशेष मार्गदर्शनाखली व डॉ.अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.चंद्रपूर यांचे विशेष नियोजनाखाली राबविण्यात येणार व सदर उपक्रमाचा शुभारंभ जिल्हास्तरावरुन मान्यवरांच्या शुभहस्ते दि. 7 एप्रिल 2025 रोजी जागतिक आरोग्य दिनी करण्यात येणार आहे. Chandrapur district pregnancy monitoring program

चंद्रपुरात ७० रुपयांच्या पेट्रोलवरून वाद

 गरोदर मातांचे मृत्यू हे योग्य आहार न घेतल्याने व बाळंतपणात वजनाचे लक्ष्य साध्य न झाल्याने  होत असल्याचे निदर्शनास दिसुन आले आहे. याकरीता गरोदरपणाची नोंदणी झाल्याबरोबर उंची आणि वजन सूत्रानुसार ( बीएमआय ) गरोदर मातेच्या घरी दर्शनी भागात गरोदर मातेचे अपेक्षित असलेले वजन “वेट स्टिकर” च्या सजवलेल्या आकड्यात लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. rural pregnancy care programs


चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात 22 माता मृत्यूची नोंद झालेली आहे. गरोदर मातांना आपले वजन किती वाढले पाहिजे याबाबतचे लक्ष्य निर्धारित करण्यासाठी अशा पद्धतीच्या उपक्रमाची योजना आखण्यात आली आहे. गरोदर मातेचे वजन योग्य नसल्यास  वेळे आधी  प्रसुती, गर्भपात व माता बालमृत्यू ओढविण्याचा जास्त संभव असतो.  हे टाळण्यासाठी  बाळंतपणाच्या तिसऱ्या  महिन्यापासून स्थानिक  प्रा.आ. केंद्र ,आरोग्य उपकेंद्रातील  आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांच्या मार्फत ठराविक काळात वजनाची  नोंदणी केली जाते. मात्र गरोदर मातेचे कुटुंब वजनाबाबत फारसे गंभीर नसतात. त्यांच्यात जनजागृती व्हावी असा दृष्टीकोन ठेउन व जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधुन सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. Awareness campaigns to reduce maternal deaths in Maharashtra

यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले घोषवाक्य “आरोग्यदायी सुरवात, आशांदायी भविष्य ” साधण्यासाठी अशा पद्धतीने वेट स्टिकर उपक्रम राबविण्याचे नियोजन आरोग्य विभाग, जि.प.चंद्रपूर यांनी केले आहे. या संपूर्ण उपक्रमात  जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी ,प्राथमिक आरोग्य केद्र व आरोग्य उपकेंद्र स्तरावरील आरोग्य विभागील  कर्मचारी  यांचा  सहभाग राहाणार आहे . यामुळेच कार्यक्रमाची  व्याप्ती  व गुणवत्ता वाढणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील  25 हजार गरोदर मातांच्या घरी जाउन ,कुटुंब सभा घेउन स्टिकर लावून याबाबतचे फायदे सांगितले जाणार आहे. तरी गावातील जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!