Protection wall collapse near CSTPS due to rain । वन्यजीव आता तुमच्या दारात! भिंत पडली, प्रशासनाचा कानाडोळा

Protection wall collapse near CSTPS due to rain

Protection wall collapse near CSTPS due to rain : चंद्रपूर – वन संपत्तीने वेढलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अनके वन्यप्राणी वावरतात, वन्यक्षेत्रातून हे प्राणी आता बाहेर निघत आहे कारण जिल्ह्यात वन्यक्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. आजची चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे, हे हल्ले कमी व्हावे यावर अजूनही प्रशासनाने ठोस पाऊले उचलली नाही. ग्रामीण भागासह आता शहरातही वन्यप्राणी सहज आपले दर्शन देऊन जातात. wall collapse due to rain

जनविकास सेनेने उधळल्या नकली नोटा

शहरातील सीएसटीपीएस वीज केंद्र परिसरात अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे, या परिसरात अनेक अनुचित घटना सुद्धा घडलेल्या आहे. सीएसटीपीएस ला लागून असलेले राष्ट्रवादी नगर व वृंदावन नगर या भागात वीज केंद्रातून भ्रमंती करीत अनेक वन्यप्राणी रात्रीच्या सुमारास येतात, ते प्राणी येऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात आली मात्र २ दिवसांपूर्वी चंद्रपुरात आलेल्या अवकाळी पावसामुळे संरक्षण भिंतीचा तब्बल ५० मीटर पर्यंतचा भाग कोसळला.

यामुळे वृंदावन व राष्ट्रवादी नगर मधील नागरिक दहशत मध्ये आलेले आहे, कारण संरक्षण भिंतीमुळे वन्यप्राणी या भागात येऊ शकत नव्हते मात्र भिंत कोसळल्याने वन्यप्राणी अगदी सहजपणे या भागात येऊ शकतात. नागरिकांनी याबाबत वीज केंद्राला माहिती देत संरक्षण भिंतीचे पुन्हा बांधकाम करावे यासाठी निवेदन सुद्धा दिले मात्र अजूनही नागरिकांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. forest animals entering city

wall collapse due to rain

संरक्षण भिंत कोसळल्याने परिसरात राहणारे अनेक कुटुंब दहशतीमध्ये आले आहे. यामुळे वीज केंद्र व्यवस्थापनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया वृंदावन नगर वासियांनी दिली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!