public hospital ambulance shortage । रुग्णाला रात्रभर रुग्णवाहिकेची प्रतीक्षा – मनसेच्या तत्परतेमुळे वाचला जीव!

public hospital ambulance shortage

“मनोज तांबेकर यांच्या तात्काळ प्रयत्नामुळे टळली जीवितहानी”

public hospital ambulance shortage : चंद्रपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) चंद्रपूर रोजगार स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ तांबेकर यांनी सार्वजनिक रुग्णालयातील रुग्णवाहिकांच्या अपुऱ्या संख्येवरून आवाज उठवला आहे. त्यांच्या तत्परतेमुळे एका गंभीर रुग्णाला वेळेत मदत मिळाली, तर दुसरीकडे रुग्णालयात अधिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी मनसेने केली आहे.

घटनेनुसार, दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूर येथील वार्ड क्रमांक ८ मध्ये दाखल असलेले बंडू सती बावणे या रुग्णाची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांनी त्यांना तातडीने नागपूर येथे हलवण्याचा सल्ला दिला. रुग्णाच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेसाठी १०८ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधला, परंतु त्यांना रात्री १० वाजेपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. ambulance availability in government hospitals

चंद्रपूर जिल्ह्यातील दारू दुकान परवाना वाटपात कोट्यवधींचा घोटाळा

या परिस्थितीत रुग्णाच्या कुटुंबीयांनी मनसेचे चंद्रपूर रोजगार स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ तांबेकर यांच्याशी संपर्क साधला. तांबेकर यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली आणि रुग्णालयाचे डीन डॉ. कांबळे यांच्याशी संपर्क साधून त्वरित रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यामुळे रात्री १२ वाजता रुग्णाला नागपूर येथे हलवणे शक्य झाले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आज दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी मनसे रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ तांबेकर यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी सार्वजनिक रुग्णालयात जाऊन तेथील सी.एस. डॉ. महादेव चिंचोडे यांना भेटून रुग्णालयातील समस्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच, रुग्णालयाला अधिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. emergency medical services shortage India

यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोजगार स्वयंरोजगार विभाग राज वर्मा, शहर संघटक रोजगार स्वयंरोजगार विभाग संदीप पटेल, शहर अध्यक्षा महिला सेना वर्षाताई भोमले, शहर उपाध्यक्षा महिला सेना मंदाताई कऱ्हाडे यांच्यासह अनेक मनसैनिक उपस्थित होते. मनसेने रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्याची मागणी करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!