Rajura coal mine local jobs
८०% चा नियम गेला कुठे? राजुराच्या खाणीत स्थानिकांवर मोठा अन्याय!
Rajura coal mine local jobs : राजुरा: राजुरा तालुक्यातील गौरी पवनी येथील कोळसा खाणीत श्री. बुद्धा या कंपनीकडून स्थानिक बेरोजगार युवकांना डावलले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) केला आहे. कंपनी व्यवस्थापन महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात बाहेरच्या राज्यातील कामगारांना रोजगार देत असल्याचा दावा मनविसेने केला आहे. Maharashtra coal mine job quota
या संदर्भात काही स्थानिक बेरोजगार युवकांनी मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. कुलदीप चंदनखेडे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. यानंतर तातडीने दखल घेत श्री. चंदनखेडे यांनी थेट श्री. बुद्धा कंपनी गाठून व्यवस्थापनाला जाब विचारला. Shri Buddha company job controversy
श्री. चंदनखेडे यांनी कंपनी व्यवस्थापनाला येत्या सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर या कालावधीत स्थानिक बेरोजगार युवकांना कंपनीत सामावून घेतले नाही, शासन निर्णयानुसार (जी.आर.) वेतन दिले नाही आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने कंपनीतील कामकाज मराठी भाषेत सुरू केले नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी श्री. बुद्धा कंपनी व्यवस्थापनाची असेल, असा इशाराही श्री. चंदनखेडे यांनी दिला आहे.
यावेळी मनविसेचे जिल्हा सचिव किशोर भैय्या मडगुलवार, प्रवीण शेवते, कृष्णा गुप्ता, शंकर भडके, प्रशांत रामटेके आणि इतर मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनविसेने घेतलेल्या या भूमिकेमुळे स्थानिक बेरोजगार युवकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आता कंपनी व्यवस्थापन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.