refusal to accept 10 rupee coin
refusal to accept 10 rupee coin : चंद्रपूर – तुकूम परिसरातील बियाणी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून ₹१० चे नाणे स्वीकारण्यास नकार देत त्यांच्या दुचाकीत भरलेले पेट्रोल परत काढण्याचे प्रकार समोर आले असून, याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. petrol pump not accepting coins
यावेळी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी सांगितले की, “भारतीय रिझर्व्ह बँकेने ₹१० चे नाणे वैध चलन असल्याचे जाहीर केले आहे. असे असतानाही काही पेट्रोल पंप चालक मनमानी करत ग्राहकांना त्रास देत आहेत. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांची पाहणी करून अशा मुजोर पंपचालकांवर तात्काळ परवानगी रद्द करण्याची कारवाई करावी.”
या निवेदनाच्या वेळी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, महिला शहर अध्यक्ष अॅड. तब्बसूम शेख, शहर संघटन मंत्री संतोष बोपचे, संघटन मंत्री मनीष राऊत, जिल्हा युवा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे आदी उपस्थित होते.
आम आदमी पार्टीने जिल्हा प्रशासनाला आवाहन केले की, नागरिकांच्या हक्काचे भारतीय चलन स्वीकारण्यास नकार देणाऱ्या पेट्रोल पंपांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल.
आम आदमी पार्टी, चंद्रपूर