tiger attack in Brahmapuri forest । मोहफुलात मृत्यूची छाया! वाघाच्या हल्ल्यात ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

tiger attack in Brahmapuri forest

What started as a peaceful morning in the forest turned into a deadly encounter. ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा गावातील ६० वर्षीय विनायक जांभुळे यांच्यावर आज रविवारी मोहफुले वेचत असताना वाघाने sudden and fatal attack केला. कालच नांदगाव-जानी भागात बिबट्याने तीन शेतकऱ्यांवर हल्ला केला होता.

tiger attack in Brahmapuri forest : मोहफूले वेचायला गेलेल्या एका साठ वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (13 एप्रिल) ला ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा येथे उघडली झाली आहे. विनायक विठोबा जांभुळे मृतकाचे नाव आहे. काल शनिवारी याच तालुक्यातील नांदगाव जानी शेतशिवारात एका बिबट्याने तीन शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असताना आज साठ वर्षीय व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. चालू वर्षातील वाघाच्या हल्ल्यातील हा ११ वा बळी आहे. man killed by tiger

चंद्रपुरात बंदोबस्तात असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण


दरवर्षी मोहा फुले वेचणीचा हंगामी सीजन येतो या योजनांमध्ये गोर गरीब व्यक्ती गावालगत च्या जंगलामध्ये जाऊन मोहबोल मोह फुले गोळा करतात त्यापासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर संसाराचा उदरनिर्वाह करतात. याच उद्देशाने आज रविवारी चिचखेडा येथील 60 वर्षीय विनायक जांभळे हा व्यक्ती परिसरातील जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेला होता. मोहफुले वेचत असताना जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला.

या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तो घरी परत न आल्यामुळे कुटुंबियांना शंका आली. त्यांनी शोधाशोध केली असता सदर वृद्धाचा मृतदेह कक्ष क्रमांक 1006 मधील जंगलात आढळून आला. या घटनेची माहिती वन व पोलीस विभागाला देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणी करिता ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. चिचखेडा गाव मेंडकी पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे मृतक हा चिचखेडा येथील होता. chandrapur tiger attack

या घटनेने चिचखेडा परिसरात पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. काल शनिवारी याच तालुक्यात नांदगाव जानी शेत शिवारात तीन शेतकऱ्यांना बिबट्याने जखमी केले आहे. या परिसरात कर यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली. धानपिकाला पाणी देण्यासाठी तीन शेतकरी शिवारात गेले होते. तरस वन्य प्राण्यापासून स्वतःचा जीव वाचवीत पळतसुटलेल्या बिबट्याने या तीन शेतकऱ्यांना शेत शिवारात जखमी केले. ही घटना ताजी असताना आज पुन्हा 60 वर्षीय वृद्धाला वाघाने ठार केले. दिवसागणिक वाघ बिबट्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू होत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोरात सुरू असतानाही वनविभाग बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे.

बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, चिचखेडा येथे वाघाच्या घातक हल्ल्यात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू; नागरिकांत भीतीचं वातावरण

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!