tiger attack on farmer
tiger attack on farmer : मूल: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चितेगाव येथे शनिवारी सकाळी एका युवा शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. शेषराज पांडुरंग नागोशे (वय 38) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. farmer killed by wild animal
वन्यजीव आता तुमच्या दारात, संरक्षण भिंत कोसळली
मिळालेल्या माहितीनुसार, शेषराज हे त्यांच्या शेतातील भाजीपाला पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. उमा नदीच्या परिसरात असलेल्या त्यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत:
चितेगाव परिसरात वाघाचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. गुरुवारी याच वाघाने गावात घुसून एक गाय आणि एका गोऱ्ह्याला ठार केले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ही प्राणघातक घटना घडली. यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराखी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. tiger attacks in Maharashtra
2025 मध्ये वाघाच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू:
या घटनेमुळे परिसरात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा वाढला आहे. 2025 या चालू वर्षात अवघ्या ४ महिन्यातच वाघांच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
वन विभागाकडून पंचनामा:
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नागोशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.