Tiger rescue operation​ । चंद्रपूरमध्ये मोठं रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; नरभक्षक वाघीण जेरबंद!

Tiger rescue operation

Tiger rescue operation​ : मूल: गेल्या काही दिवसांपासून मूल तालुक्यात धुमाकूळ घालणारी आणि तीन ते चार जणांचा बळी घेणारी नरभक्षक वाघीण अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडली आहे. वनविभागाच्या पथकाला बुधवारी रात्री ही महत्त्वपूर्ण यश मिळाले. मरेगाव गावाजवळील उमा नदीच्या परिसरात बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन तिला जेरबंद करण्यात आले. Man-eater tigress captured

चंद्रपुरातील ४ मनसे पदाधिकाऱ्यांवर खंडणी चे गुन्हे दाखल

या वाघीणीने मरेगाव, आकापूर, चितेगाव आणि एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण केली होती, ज्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग भयभीत होता. वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर वाघीण जेरबंद झाली असली, तरी तिची अंदाजे एक वर्षाची तीन पिल्ले अजूनही बेपत्ता आहेत. या पिल्लांना पकडण्यासाठी वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत पिल्लांना पकडण्यात यश आले नव्हते. Forest department success

या वाघीणीच्या हल्ल्यात मूल तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील मेंढपाळ निलेश दुर्गा कोरेवार, चितेगाव येथील युवा शेतकरी शेषराज पांडूरंग नागोशे आणि मेंढपाळ मल्लाजी येग्गावार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पाच एप्रिलपासून वनविभाग वाघीणीला जेरबंद करण्यासाठी मोठी मोहीम चालवत होता. अखेर उमा नदीच्या परिसरात शिकार करण्यासाठी आलेल्या वाघीणीला वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम नायगमकार यांनी अचूक वेध घेत बेशुद्ध केले. Wildlife rescue mission

रेस्क्यू ऑपरेशनसाठी वनविभागातील ७० कर्मचाऱ्यांची मोठी टीम कार्यरत होती. वाघीण आता पिंजऱ्यात सुरक्षित असून तिच्या पिल्लांचा शोध घेण्यासाठी वनविभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पिल्लांना शोधण्यासाठी परिसरात ५० कॅमेरे लावण्यात आले आहेत, ज्यात तीन लाईव्ह कॅमेऱ्यांचा आणि एका ड्रोन कॅमेऱ्याचा समावेश आहे. Chandrapur wildlife news

या वाघीणीने केवळ माणसांवरच नव्हे, तर परिसरातील जनावरांवरही हल्ले करून त्यांना जखमी केले होते. वाघीणीला जेरबंद केल्यानंतर तिला कोणत्या ठिकाणी हलवायचे, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या ज्या ठिकाणी वाघीणीला पकडले आहे, त्या परिसरात कडक पहारा ठेवण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई चंद्रपूर येथील मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आणि विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या नेतृत्वात सावली येथील वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे, वनरक्षक, क्षेत्रसहायक, कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि शूटर यांच्या टीमने केली. Chandrapur wildlife news

तीन निष्पाप बळी घेतल्यानंतर अखेर नरभक्षक वाघीण जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आता वनविभागाचे लक्ष तिच्या बेपत्ता पिल्लांना शोधण्यावर केंद्रित झाले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!