WCBTRL road project delay
WCBTRL road project delay : चंद्रपूर शहरातील बल्लारशाह बायपास महामार्गावरील अष्टभूजा ते बाबूपेठ दरम्यानच्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम गेली ८ ते १० वर्षांपासून रखडलेले आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेक निरपराध नागरिकांचे प्राण गेले आहेत. या गंभीर विषयाकडे वारंवार दुर्लक्ष केल्या जात असल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वात वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहेत.
70 रूपयांच्या पेट्रोल वरून चंद्रपुरात वाद
ब्रिजचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे आम आदमी पार्टीने WCBTRL व विश्वराज Infrastructure या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. कंपनीने पूर्वी रेल्वे परवानगीसाठी अर्ज दाखल केल्याचे सांगून एका वर्षाच्या आत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता दीड वर्ष उलटूनही कोणतीही प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. pending bridge construction cases
उल्लेखनीय बाब म्हणजे विश्वराज कंपनीचे नाव जिल्ह्यातील अनेक वादग्रस्त कामांमध्ये आढळले आहे. विशेष म्हणजे, भारतीय जनता पार्टीला देण्यात आलेल्या ७ कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉल बॉण्ड प्रकरणातही या कंपनीचे नाव चर्चेत आले होते. यासंदर्भात आम आदमी पार्टी भविष्यात आणखी खुलासे करणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे. AAP demands legal action on contractor
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने कार्यकारी अभियंत्यांना WCBTRL व विश्वराज कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पक्षाच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी दिला आहे.

यावेळेस आप नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, प्रशांत शिदूरकर, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, अनुप तेलतूमडे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.