youth joining congress party
“राजकीय अस्थैर्य, बेरोजगारी आणि वाढत्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर युवकांनी निवडली युवक काँग्रेसची वाट”
youth joining congress party : चंद्रपूर :– चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू अजय धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत चंद्रपूर जिल्ह्य़ातील विविध गावातील अनेक कर्तृत्ववान युवकांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
चंद्रपूर जिल्ह्यात दारू दुकानाच्या परवाना वाटपात मोठा भ्रष्टाचार
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे व युवक कॉंग्रेस चे माजी सचिव राजीव खजांजी यांनी सर्वांना युवक काँग्रेसचे दुपट्टे देऊन सर्वांचे स्वागत केले. तसेच येणाऱ्या काळात विविध पक्षातील अनेक तरुण कार्यकर्ते हे युवक काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन काम करण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी यावेळी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे माजी सचिव राजीव खाजांजी, यु. काँ. महासचिव हर्षल येलमुले यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. Shantanu Dhote youth congress
वाढती बेरोजगारी, महागाई तसेच सध्यास्थितीत वाढता जातीयवाद, अराजकता याला कंटाळून युवक काँग्रेसच्या मानवतावादी विचारधारेवर विश्वास व्यक्त करीत चंद्रपूर जिल्हातील विविध गावातील वेदांत प्रदीप देठे, आयुष बंडू सोनटक्के, श्रीनाथ लेटावार, चैतन्य पांडे, अमोल अड्बाले, तेजस देवगडे, नवीन एगुले, समशेर शाह, जय पेटला, शरद येड्लावार, जतीन पळ, क्रिष्णा तवारी, मोहम्मद अल्तमास शाह, पियुष गुडे, भारत कांबटकर, युगल मडावी, सिद्धार्थ कोंडागुरला यासह अनेक युवकांनी युवक काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.