Chandrapur district shocking incident
Chandrapur district shocking incident : १० मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली, पहिल्या घटनेत वाघाच्या हल्ल्यात प्रथमच ३ महिलांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत प्रशिक्षणार्थी ३ डॉक्टर तरुणांचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला.
जिल्ह्यातील पहिलीच घटना, १६ नागरिकांचा बळी
तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची थरारक घटना आज शनिवारी (१०मे)दुपारी चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यात मेंढा माल या गावी उघडकीस आली आहे. रेखा शेंडे( वय 55), कांता बुद्धाची चौधरी (वय ६०), शुभांगी मनोज चौधरी (वय 31) असे मृतांचे नावे आहेत. तिघीही सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल या गावातील रहिवासी होत्या. मृतांमध्ये सासूचा समावेश आहे. सिंदेवाही तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे तर मेंढा माल या गावात शोककळा निर्माण झाली आहे. Chandrapur tiger attack kills 3 women
चंद्रपूर जिल्हा लोक अदालतीमध्ये जलद न्याय
सिंदेवाही तालुक्यात सध्या तेंदुपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू झाला आहे. आज शनिवारी मेंढामाल गावातील रेखा शेंडे( वय 55), कांता बुद्धाची चौधरी (वय ६०), शुभांगी मनोज चौधरी (वय 31) ह्या महिला तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या परंतु दुपार पर्यंत या तीन महिला घरी परत आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी काळजी करीत त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. आणि वन व पोलीस विभागाला माहिती देण्यात आली. लगेच वन व पोलीस विभागाचे अधिकारी मेंढामाल या गावात दाखल झाले. त्यांनी तत्काळ पत्ता तोडाई सुरू असलेल्या जंगलात शोध मोहीम राबविली. दुपारी तीन वाजताच्या सुमारास डोंगरगाव बीटातील 1355 कंपार्टमेंट मध्ये मृतदेह आढळून आला. विशेष बाब म्हणजे महिलांचे मृतदेह हे १० ते १५ मीटर अंतरावर होते. Chandrapur human-wildlife conflict
घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदना करता पाठविण्यात आले. या घटनेमुळे शिंदेवाही परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे तसेच मेंढा माल गावात या घटनेची माहिती होताच शोककळा पसरली.
डोंगरगाव बीटात एक वाघीण बछड्यांसह भ्रमंती करीत असल्याचे काही नागरिकांना आढळून आले आहे. त्यामुळे या तिघींनाही वाघिणीनेच ठार केल्याची चर्चा आहे.
चारगाव वडगे परिसरात एक महिला जखमी
सिंदेवाही तालुक्यातील चारगाव बडगे परिसरात वंदना विनायक गजभिये ही महिलाही चंदू पत्ता तोडणसाठी जंगलात गेले होते. आज शनिवारी या महिलेवर वाघाने हल्ला केला यामध्ये ती जखमी झाली. तिला प्राथमिक उपकेंद्रात उपचार करता भरती करण्यात आले आहे. Chandrapur human-wildlife conflict
२ महिन्यांनी पुन्हा तीच जागा, तिघेजण बुडाले
व्याहाड खुर्द : चंद्रपूर गडचिरोली सीमेवरील नदीच्या पुलाखाली वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या गडचिरोली येथील रुग्णालयातील आठ पैकी तीन शिकावू डॉक्टर हे बुडाल्याची माहिती प्राप्त झाली असून घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार हे आपल्या चमूसह घटनास्थळी पोहोचले होते मात्र सायंकाळ झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली आहे. Wainganga river drowning 3 trainee doctors Chandrapur
सदर तीनही युवक हे गडचिरोली येथे MBBS चे प्रथम वर्गात शिक्षण घेत आहे. आज सुट्टी असल्याने हे सर्व जण नदीमध्ये अंघोळीसाठी गेले होते.यावेळी ऐकून 8 जण होते मात्र त्यापैकी 20 वर्षीय गोपाळ गणेश साखरे, राहणार चिखली जिल्हा बुलढाणा, 20 वर्षीय पार्थ बाळासाहेब जाधव राहणार शिर्डी, जिल्हा अहमदनगर,20 वर्षीय स्वप्नील उद्धवसिंग शिरे राहणार छत्रपती संभाजी नगर, हे बुडाले. Wainganga river
सुट्टीचा दिवस असल्याने 8 शिकावू डॉक्टर तरुण पोहण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात गेले होते, मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण बुडाले, विशेष बाब म्हणजे 26 फेब्रुवारीला याच ठिकाणी चंद्रपुरातील 3 सख्ख्या बहिणीचा बुडून मृत्यू झाला होता. सदर घटनेबाबत सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुरुलवार म्हणाले कि सदर घटना हि सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली, रात्र झाल्याने शोधमोहिम थांबविण्यात आली आहे सकाळी पुनः शोधमोहीम सुरु करण्यात येईल.