tiger kills cub in buffer zone 2025 । ताडोबा प्रादेशिक जंगलात वाघाचा बछड्यावर हल्ला, बछड्याचा मृत्यू

tiger kills cub in buffer zone 2025 । ताडोबा प्रादेशिक जंगलात वाघाचा बछड्यावर हल्ला, बछड्याचा मृत्यू

tiger kills cub in buffer zone 2025

tiger kills cub in buffer zone 2025 : चंद्रपूर – ताडोबाच्या बफर झोनला लागून असलेल्या प्रादेशीक वनविकास महामंडळाच्या चिमुर तालुक्यातील महालगाव बिटातील जंगलात (कंपाटमेंट नंबर 21) मध्ये वाघाने एका बच्छड्याला ठार केल्याची घटना समोर आली आहे. काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून प्रादेशीक जंगलातून पर्यटन सफारी आटोपून येत असताना काही पर्यटकांच्या ही घटना लक्षात आली. 

चिमूर हादरलं, तिघांनी तरुणीवर केला सामूहिक बलात्कार

ताडोबा व्यतिरिक्त चिमुर तालुक्यात असलेल्या  प्रादेशीक वनविकास महामंडळाच्या जंगलात पर्यटन सफारी सुरू आहे. ताडोबा अभयारण्याच्या बफर झोनला लागून असलेल्या चिमुर तालुक्यातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील महालगाव बिटात काही दिवसांपासून तिन बच्छड्यासह एक वाघिण भ्रमंती करताना वनविभागाला आढळून येत आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरामध्ये ही ती दिसून आली आहे. wildlife conflict tiger cub death Maharashtra

ती कुठून आली हे वनविभागालाच माहित नाही, परंतु पर्यटकांना मात्र तिचे दर्शन होत असताना काल सोमवारी (19 मे) सायंकाळी महालगाव बिटातील कंपाटमेंट क्रं. 21 मध्ये उरकुडपार तलावाजवळ दु:खद घटना समोर आली. वाघासोबत एका सात महिण्याच्या मादी बच्छड्याची झुंज झाली. यामध्ये वाघाने बच्छड्याला ठिकठिकाणी केलेल्या गंभिर दुखापतीत सात महिण्याचा मादी बच्छडा ठार झाला. वाघ आणि बच्छड्यामध्ये झालेल्या झुंजीनंतर वाघ त्या बच्छड्याला तोंडात नेत असताना काही पर्यटकांना दिसून आले. त्यामुळे या घटनेची माहिती सर्वत्र पसरली.

बफर झोन मध्ये २ वाघांची एंट्री

वनविभागाला सदर घटनेची माहिती झाल्यानंतर विभागीय व्यवस्थापनक मोटकर, वनपरिक्षेत्राधिकारी सोनुरकर, वनपरिक्षेत्राधिकारी देऊरकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. परिसर आणि मृतदेहाची पहाणी केल्यानंतर वाघाच्या झुंजीत बच्छड्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. विशेष म्हणजे या प्रादेशीक वनात ताडोबात दोन वाघ आल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकीच एकाने त्या बच्छड्याला ठार केल्याचा संशय वनविभागाला आहे. 5 महिन्यात आतापर्यंत एकूण 6 वाघाचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये झुंज व नैसर्गिक मृत्यूचा समावेश आहे.

Powered by myUpchar

उमरेड कऱ्हांडला मधून बच्छड्यांसह जान्हवी नावाची वाघिण आल्याची चर्चा

चिमूर तालुक्यातील प्रोदशीक वनविकास मंडळाच्या जंगलात काल ज्या बच्छड्याचा वाघासोबत झालेल्या झुंजीत मृत्यू झाला. ती वाघिण काही दिवसापासून या जंगलात नव्यानेच आली आहे. तिचे वनविभाग व पर्यटकांनाही दर्शन झाले आहे. परंतु ती कुठून आली हे सांगणे कठिण असल्याचे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु सध्या जी चर्चा सुरू आहे, त्यानुसार उमरेड कऱ्हांडला अभयरण्यातून तिन बच्छ्ड्यांसह ती वाघिण आल्याची चर्चा सुरू आहे. new tiger arrival in Chimur forest Maharashtra

जान्हवी नावाची ती वाघिण असल्याचे सांगितले जात आहे. याच प्रादेशीक वनाला ताडोबा अभयारण्याचा बफर झोन लागून आहे. त्यामुळे त्या ठिकाणावरून दोन वाघाची प्रादेशीक वनात एन्ट्री झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कलुवा नावाच्या वाघाने त्या बच्छड्याला ठार केल्याची चर्चा आहे. परंतु नावाबाबत मात्र अधिकाऱ्यांनी सांगण्यास नकार दिला. प्रादेशीक वनातील एन्ट्री झालेल्या त्या वाघांनी काल एका बच्छड्याला ठार केल्यानंतर त्या अन्य दोन बच्छड्यांच्या जिवाला तर धोका नाही ना अशी चर्चा पर्यटकांमध्ये सुरू आहे.  जिव धोक्यात असल्याचेही बोलल्या जात आहे. 

Sharing Is Caring:

Leave a Comment