Vijay Wadettiwar on drowning tragedy
Vijay Wadettiwar on drowning tragedy : शनिवार दिवशी सुट्टी असल्याने वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथील सहा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सावली तालुक्यातील व्याहाळ (बूज) नजीकच्या वैनगंगा नदी पात्रावर सुट्टीचा आनंद घेण्याचा बेत आखला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नदी काठावर व्हॉलीबॉल खेळत असताना अचानक बॉल नदीत गेल्याने व तेथे खोल डोह असल्याने व्हॉलीबॉल काढण्याच्या नादात गोपाल गणेश साखरे वय (२०) वर्षे रा. चिखली जिल्हा बुलढाणा पार्थ बाळासाहेब जाधव (२०) वर्षे राहणार शिर्डी जिल्हा अहिल्यानगर स्वप्निल उद्धवराव शिरे वय (२०) वर्षे राहणार छत्रपती संभाजी नगर हे तिघेही बुडाले. Gadchiroli river drowning incident
त्या नरभक्षकी वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा – आमदार वडेट्टीवार
याची माहिती मिळतात बचाव पथके यांनी शोधाशोध केली मात्र अंधार झाल्याने बचाव कार्य थांबले. आज पुन्हा बचाव पथकाने शोधमोहीम राबवली असता बुडालेल्या तीनही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी तीनही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता सावली येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.
तत्पूर्वी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल येथील तेंदु पत्ता संकलनासाठी गेलेल्या तीन महिलांना वाघाने हल्ला चढवून ठार मारल्याची घटना काल १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळतात आज राज्याचे माजी विरोधी पक्ष नेता, विधिमंडळ पक्षनेते, लोकलेखा समिती अध्यक्ष तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत मृतक महिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले. Maharashtra medical students accident news
तर लगेच व्याहाड (बूज)येथील वैनगंगा नदी पात्रात त बुडालेल्या तीनही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी क्षणचाही विलंब न लावता तात्काळ सावली येथील ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मृत प्रशिक्षणार्थी डॉक्टर हे गरीब घरचे हुशार व होतकरू विद्यार्थी होते.
मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना सहानभूती पर आधार मिळावा याकरिता थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असे ही यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले. याप्रसंगी नगराध्यक्ष लता लाकडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे ,युवा शहर अध्यक्ष अमर कोणपत्तीवार,नगरसेवक प्रितम गेडाम,नगरसेवक अंतबोध बोरकर,सामाजिक कार्यकर्ते गब्बर दुधे,कमलेश गेडाम पत्रकार उदय गडकरी, सूरज बोम्मवार आदी उपस्थित होते.










