dispute over money । “हिशोब दे ना!” एवढंच म्हणणं जीवावर बेतलं… चौकातच झाली हत्या!

dispute over money । “हिशोब दे ना!” एवढंच म्हणणं जीवावर बेतलं… चौकातच झाली हत्या!

dispute over money

dispute over money : मूल:-पैशाच्या हिशोबावरून झालेल्या क्षुल्लकशा कारणावरून कोंबडी कापण्याच्या सत्तूरणे सपासप वार करून एका युवकाची भर चौकात हत्या करण्यात आली. घटनेने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. ही घटना मूल तालुक्यातील मारोडा येथे बुधवारी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली. man killed in broad daylight with cleaver

शंतनु मूर्लिधर येरणे वय २२ वर्ष रा.मारोडा असे मृत व्यक्तीचे नाव आहे.तर अमित अनिल निकेसर वय ३२ वर्ष रा.मारोडा असे आरोपीचे नाव आहे.अमित निकेसर यांचे मारोडा येथे अमित चिकन सेंटर नावाने चिकन विक्रीचे दुकान असून रेतीचा व्यवसाय आहे. शंतनु येरणे हा अमितकडे दिवांजीचे काम करीत होता.

सोनम बेवफा है

महसूल विभागाकडून घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटप सुरू असल्याने अमितने घरकुल लाभार्थ्यांना रेतीचा पुरवठा केला होता.शंतनु सकाळी रेतीची वसुली करून अमितकडे हिशोब देत असताना दोघांमध्ये किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली.वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने अमितने चिकन सेंटर मधील कोंबड्या कापण्याच्या सत्तूरने शंतनुच्या पोटावर,छातीवर सपासप वार जागीच ठार केले.

वाद सोडविण्यासाठी आलेल्या शंतनुचे वडील सुध्दा जखमी झाले.घटनेनंतर आरोपीने मूल पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना घटनेची आपबिती सांगीतली.पोलिसांनी आरोपीला अटक करून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.

गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान

मूल तालुक्यातील ११ महिन्यात चार हत्येच्या घटना घडल्या.गुन्हेगारीच्या घटनांनी नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.सध्या मूल पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षकांचे पद रिक्त असून प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर कारभार हाकणे सुरू आहे.त्यामुळे प्रभारी अधिकारी वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पेलतील काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment