illegal BT cotton seed trafficking Maharashtra । चोर BT बियाण्यांची चंद्रपूरमध्ये मोठी खेप पकडली

illegal BT cotton seed trafficking Maharashtra । चोर BT बियाण्यांची चंद्रपूरमध्ये मोठी खेप पकडली

illegal BT cotton seed trafficking Maharashtra

illegal BT cotton seed trafficking Maharashtra : चंद्रपूर/बल्लारपूर – राज्यात चोर बीटी बियाण्यांवर बंदी असताना सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात याचा सर्रासपणे वापर सुरु आहे, इतर राज्यातून चोर बीटी बियाण्यांची वाहतूक सध्या मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात चोर बीटी बियाण्यांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत १२ लक्ष रुपयांचे चोर बीटी बियाणे पकडले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीच्या सततच्या असह्य त्रासाने कंटाळून पत्नीने केली पतीची हत्या

१२ लक्ष रुपयांचे बियाणे जप्त

१४ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांना चोर बीटी बियाण्यांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी विसापूर-बल्लारपूर मार्गावर नाकेबंदी करीत वाहनांची तपासणी करीत होते इतक्यात वाहन क्रमांक mh ४० AB-२३५६ ला थांबविता पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये ८०० मग चोर बीटी पुष्पा संशोधित हायब्रीड कापूस बियाणे प्रति पॉकेट एक हजार पाचशे रुपये प्रमाणे १२ लक्ष रुपयांचा माल सहित वाहन असा एकूण १३ लक्ष ५० हजारांचा मुद्देमाल यावेळी जप्त केला. BT cotton seed smuggling arrested in Chandrapur

पोलिसांनी बियाण्यांची पडताळणी व कारवाई संबंधात कृषी विभागाला माहिती दिली, कृषी विभागाच्या अहवालावरून वाहन चालक ३७ वर्षीय इम्रान खान नासिर खान राहणार बगड खिडकी चंद्रपूर व माल मालक सुमित नगराळे राहणार आष्टी, जिल्हा गडचिरोली यांच्यावर पोलीस स्टेशन बल्लारपूर मध्ये भारतीय न्याय संहिता सहकलम १४, ७ (अ), ७ (क), ७ (ड), १९ बीज अधिनियम १९६६ व बियाणे नियंत्रक आदेश १९८३ चे कलम ३,८,१ तसेच बियाणे नियम १९६८ चे कलम ८,९,१०,११ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ८,१५, १५ (१),(२, १६ (१),(२) व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ (२) (ड) ७ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे. Chandrapur smuggled BT cotton seed bust

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार व स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment