Illegal school in Chandrapur
Illegal school in Chandrapur : चंद्रपूर – शासकीय सैनिक शाळेच्या जवळच “SSCN सैनिक स्कूल चंद्रपूर” नावाने बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या खासगी शाळेविरोधात आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांच्यावतीने शिक्षण विभागाला निवेदन देत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सदर शाळेस कोणतीही शासकीय मान्यता, परवाना अथवा UDISE क्रमांक नसतानाही ती निर्बंध न पाळता खुलेआम प्रवेश प्रक्रिया राबवते आहे. unauthorised school in Chandrapur SSCN
या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच राजू कुडे – युवा जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांनी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांना निवेदन सादर केले. त्यानंतर शिक्षण अधिकारी (प्राथमिक), शिक्षण अधिकारी (माध्यमिक) आणि SSCN शाळेचे प्रतिनिधी यांच्यासोबत आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाची संयुक्त बैठक पार पडली.
माझी आई बेपत्ता, चंद्रपूर पोलिसांवर गंभीर आरोप
या बैठकीत, सदर शाळेला नव्या प्रवेशांना मनाई करण्यात आली असून, लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण अधिकारी (माध्यमिक) यांनी दिले.
तर शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन
पालकांची फसवणूक आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बेकायदेशीर शाळांविरोधात तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. नियमबाह्य शिक्षण संस्था चालवणे हे कायद्याच्या चौकटीत गुन्हा असून अशा प्रकारांवर ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. जर ८ दिवसांत योग्य कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा राजू कुडे यांनी दिला आहे.
यावेळेस आपचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महिला महानगर अध्यक्षा ऍड. तब्बसूम शेख, महानगर संघटनमंत्री संतोष बोपचे, प्रशांत सिदूरकर, स्नेहल नगराळे, इत्यादी उपस्थित होते.