msedcl celebrated 20th anniversary
msedcl celebrated 20th anniversary – चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित 20 व्या वर्धापन दिनानिमित्त सांघिक कार्यालय मुंबई यांचेकडून दिलेल्या कार्यक्रमानुसार 1 जून ते 6 जून 2025 विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने दिनांक 6 जून 2025 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित चंद्रपूर मंडळ यांचे वतीने वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
चंद्रपुरात सामाजिक जबाबदारीचा अनोखा विवाह सोहळा
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10.10 वाजता सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सुरक्षेची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. त्यानंतर शकुंतला सेलिब्रेशन हॉल चंद्रपूर येथे कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा माननीय अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे चंद्रपूर मंडळ यांचे अध्यक्षतेखाली व श्री रमेश सानप अधीक्षक अभियंता (पा.आ.) चंद्रपूर परिमंडळ, श्री सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) (प्र.) सुशिल विखार, श्री. विशाल पिपरे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, चंद्रपुर विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारव्हेकर, तसेच यावेळी चंद्रपूर परिमंडळातील सर्व सन्माननीय अभियंते,यंत्रचालक, वाहिनी कामगार व इतर तांत्रिक अतांत्रिक कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. msedcl 20th foundation day celebration in chandrapur
चंद्रपूर मंडल वर्धापन दिन आयोजन समितीतर्फे मंडळातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे करिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सर्व अभियंता, तांत्रिक अतांत्रिक कर्मचाऱ्यांनी त्यांचे कुटुंबीय व पाल्य यांचे सह उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेतला.

बक्षीस वितरण सोहळा
सायंकाळी बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. श्रीमती संध्या चिवंडे चंद्रपूर मंडळ यांनी इतर तांत्रिक अतांत्रिक कर्मचारी यांचे सह केक कापून महावितरण कंपनीचा 20 वा वाढदिवस साजरा केला व सर्व अधिकारी कर्मचारी यांना विद्युत सुरक्षा सप्ताह व वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर चंद्रपूर मंडलातील सर्व अधिकारी कर्मचारी त्यांचे कुटुंबीय व पाल्य यांच्याकरिता गीतांचा संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला व सोबतच सर्वांकरिता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. रात्री 10 वाजेपर्यंत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगीत रजनी व स्नेहभोजनाचा आनंद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.










