need for bypass road in Chandrapur
need for bypass road in Chandrapur : चंद्रपूर : शहराची वाढती लोकसंख्या आणि बाहेरील वाहनांची वाढती वर्दळ यामुळे चंद्रपूरमध्ये वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी चंद्रपूर शहरातील पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या दरम्यान बायपास मार्गाच्या तातडीने बांधकामाची मागणी केली आहे.
चंद्रपुरात भरदिवसा चाकू हल्ला, दोघांना अटक
सध्या NH ९३० आणि NH ९३०D या राष्ट्रीय महामार्ग दरम्यानची वाहतूक थेट चंद्रपूर शहरातून जाते. गडचिरोली, तेलंगणा, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर यांसारख्या विविध ठिकाणांहून येणारी आणि जाणारी वाहने चंद्रपूर शहरातून सातत्याने ये-जा करत असल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या वाढत्या वाहतुकीमुळे शहरात अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढले आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास आणि धोका सहन करावा लागतो. NH 930 city congestion
या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना म्हणून, खासदार धानोरकर यांनी पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यान बायपास मार्गाचे बांधकाम करण्याची मागणी केली आहे. हा बायपास मार्ग NH ९३० ते NH ९३०D दरम्यानच्या वाहतुकीला शहराबाहेरून वळवावे.
या त्रासातून चंद्रपूरला मुक्त करा
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली आहे की, या अत्यंत महत्त्वाच्या मागणीवर सकारात्मक विचार करून त्वरित कार्यवाही करावी आणि चंद्रपूरकरांना वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या त्रासातून मुक्त करावे. चंद्रपूरच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा बायपास मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.










