poor quality road construction
poor quality road construction : चंद्रपूर, २७ जून २०२५: चंद्रपूर महानगरपालिकेच्या तुकूम प्रभाग क्रमांक १ मधील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचा वापर झाल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टी (आप) चंद्रपूर महानगरने केला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) तयार करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी ‘आप’ने केली आहे. action against low quality public works
अपघातग्रस्त आई आणि मुलगा व खासदाराची माणुसकी
आम आदमी पार्टीचे महानगर अध्यक्ष श्री. योगेश देवराव गोखरे यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत अधिकृत निवेदन सादर केले. महाडोळे यांच्या दुकानापासून श्रद्धा नगर बोर्डपर्यंतच्या या सिमेंट रस्त्यात M30 ऐवजी केवळ M15 ग्रेडचा सिमेंट वापरल्याचा दावा ‘आप’ने केला आहे. फेसबुक लाईव्हद्वारे रस्त्याची पाहणी करताना, ‘आप’ने स्वतःच्या स्तरावर केलेल्या प्राथमिक चाचणीत ही बाब समोर आल्याचे गोखरे यांनी सांगितले.
कायदेशीर कारवाई करा
या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत गोखरे यांनी PWD च्या अधिकृत टेस्टिंग टीम, संबंधित कंत्राटदार आणि आम आदमी पार्टीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत रस्त्याची पुन्हा एकदा चाचणी करण्याची मागणी केली आहे. या चाचणीत रस्त्याचा दर्जा निकृष्ट आढळल्यास संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. public accountability in road development
या निवेदनाची दखल घेत PWD विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी निवेदन सादर करताना मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष, आप, चंद्रपूर), राजू कुडे (युवा जिल्हाध्यक्ष), संतोष बोपचे (महानगर संघटन मंत्री), विशाल भाऊ, जितेंद्र भाटिया यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
“जनतेच्या पैशातून तयार होणाऱ्या विकासकामांमध्ये दर्जा महत्त्वाचा आहे. रस्त्याच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. गरज पडल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा योगेश गोखरे यांनी दिला. या आरोपामुळे चंद्रपूर शहरातील विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता या प्रकरणाची पुढील चौकशी आणि कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










