resort violence in Chandrapur news
resort violence in Chandrapur news : जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य परिसरात शेकडो रिसॉर्ट पर्यटक व नागरिकांच्या मनोरंजनाकरिता बांधण्यात आले आहे, मात्र आता हे रिसॉर्ट दारू व नशेचा अड्डा बनत चालले आहे, निसर्गाच्या सानिध्यात मनोरंजन व पार्टी करण्यासाठी आलेल्या काही युवकांनी चंद्रपुरातील पद्मापूर पोद्दार रिसॉर्ट मध्ये गोंधळ घालत, रिसॉर्ट मॅनेजर वर चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केले, याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी ५ आरोपी युवकांना अटक केली.
तलवार हातात, दहशत निर्माण करण्यापूर्वी सिंदेवाही पोलिसांनी केली अटक
१६ जून रोजी दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असेल्या पद्मापूर गावाजवळील पोद्दार रिसॉर्टमध्ये हि घटना घडली. येथे पूल पार्टीसाठी आलेल्या तरुणांनी नशेत धुंद होऊन डीजे चा आवाज कमी करण्याबाबत वाद करत रिसॉर्ट मॅनेजरवर चाकूने हल्ला केला. Poddar resort crime update June 2025
डीजेच्या आवाजावरून वाद
घुग्घूस येथील पाच तरुण सोमवारी सकाळी सुमारास ११ वाजता पोद्दार रिसॉर्टमध्ये आले. दारूच्या नशेत त्यांनी डीजे चा आवाज कमी करा म्हणत वाद घातला. वाद इतका टोकाला गेला की, त्यांनी थेट रिसॉर्ट मॅनेजर ३१ वर्षीय अमर द्विवेदी वर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आणि तेथून फरार झाले. जखमी मॅनेजरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांत पाचही आरोपींना भद्रावती येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ललित गाताडे, आकाश आसुटकर, विष्णू बोंगाले, करण तीर्थगिरिवार आणि कृष्णा तोगार यांचा समावेश असून हे सर्व आरोपी घुग्घूस येथील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी युवकांवर कलम १०९ (१), २९६, ३५१ (३), १८९ (४), १९१ (३) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.










