AAP election campaign in Maharashtra । 2025 निवडणुका : केजरीवालांच्या आदेशावरून ‘आप’ मैदानात उतरली, चंद्रपूर ते मुंबई – AAP चा बुलंद प्रचार

AAP election campaign in Maharashtra । 2025 निवडणुका : केजरीवालांच्या आदेशावरून ‘आप’ मैदानात उतरली, चंद्रपूर ते मुंबई – AAP चा बुलंद प्रचार

AAP election campaign in Maharashtra

AAP election campaign in Maharashtra : आम आदमी पार्टी येत्या काळात चंद्रपूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुका कोणत्याही युतीशिवाय लढवेल आणि चंद्रपूर जिल्ह्यात त्याची अधिकृत तैयारी सुरू झाली आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रभारी दिल्ली आमदार प्रकाश जारवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.

चंद्रपुरातील अवैध सावकारांचा गेम ओव्हर

आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचा कार्यभार सोपवला आहे. त्यांनी दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित केल्या जात आहे. बैठकां मध्ये पार्टीला मजबूत करणे, निवडणूक रणनीती ठरवणे, आप चे काम लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यासाठी जनजागृती करणे, सर्वसामान्यांशी संपर्क वाढवणे, शहरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी अधिकायांशी संपर्क साधणे याची कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली. aam aadmi party Maharashtra 2025 elections

सांडपाणी योजनेत मोठा घोळ

चंद्रपूर शहरात ४५० कोटींची अमृत कलश योजना आणली गेली पण अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचत नाही आहे. निवडणुकीदरम्यान भाजपने दिलेली सर्व आश्वासने फोल ठरत आहेत. सांडपाणी योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. सरकारी निधीचा वापर जनतेच्या गरजा आणि सेवा पूर्ण करण्यासाठी करण्याऐवजी येथील लोकप्रतिनिधी त्याचा वापर विशेष व्यक्तींच्या घरांचे रक्षण करण्यासाठी करत आहेत. कोणत्याही प्रकारच्या विकासकामांच्या निविदा स्थानिक लोकप्रतिनिधीच्या जवळच्यांना दिल्या जात आहेत. यामध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचारही समोर येत आहेत.

शहरातील बहुतेक सरकारी शाळा जीर्ण अवस्थेत आहेत, रस्ते खराब आहेत, मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाही आहे, सरकारी रुग्णालयातील महत्त्वाच्या मशीना बंद स्थितित आहेत परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. लोकांपर्यंत पोहोचणाया योजनांऐवजी त्या फक्त कागदावरच राहिल्या जात आहेत असा आरोप आमदार जारवाल यांनी केला. लोकशाही, विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि जनहितासाठी काम करण्यासाठी ‘आप’ने राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करून कोणत्याही युतीशिवाय निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. upcoming Zilla Parishad elections 2025 Maharashtra


पत्रकार परिषदेला अजित फाटक, भूषण ठाकूरकर, सुनील मुसळे, योगेश गोखरे, राजू कुडे, मयूर राईकवार, तबस्सुम शेख आदी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment