chandrapur ganesh murti market 2025
chandrapur ganesh murti market 2025 : चंद्रपूर १० जुलै – आगामी श्रीगणेशोत्सव काळात यंदाही चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले असुन श्री गणेश मूर्ती दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये व नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता याव्या या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी गणेश मंडळे,मूर्तिविक्रेते व मुर्तीकार संघटनांच्या संयुक्त बैठकीत सांगितले.
चंद्रपुरात पाणीपट्टी कराची वसुली करण्यासाठी आता वॉर्ड सखी येणार
लवकरच गणेशोत्वास सुरवात होणार असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात अधिकांश घरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्तिविक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करत असल्याने नागरिकांना मूर्ती खरेदीस गर्दीच्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नसतो.यावर उपाय म्हणुन यावर्षी मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांना मूर्तिविक्रीसाठी जागा मनपाने उपलब्ध करून दिली होती व त्यात जवळपास 250 स्टॉल्स लागुन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.
चांदा क्लब येथे येथे स्टॉल्स, पेंडॉल व्यवस्था मूर्ती विक्रेत्यांना स्वतः करावयाची असुन विद्यूत व्यवस्थेसाठी पॉईंट, फिरते शौचालय,स्वच्छतेची व्यवस्था,पाणी टँकर मनपा प्रशासनातर्फे करून दिली जाणार आहे. नोंदणी न करता मूर्ती विक्री व साहित्य विक्री करणाऱ्यावर तसेच मनपाने निश्चित करून दिलेल्या जागेशिवाय इतरत्र विशेषतः फुटपाथवर मुर्ती विक्री करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. municipal rules for ganesh festival
सर्वांच्या सहकार्याने मागील वर्षी पर्यंत पीओपी मूर्ती बंदी 100 टक्के यशस्वी झाली होती. यंदा मा. उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली आहे. मात्र, या मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट ठेवली आहे. त्यामुळे बंधन नाही मात्र मातीच्याच मूर्तींची खरेदी – विक्री करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
मूर्तींची उंची –
सर्व मोठ्या मूर्ती या जटपुरा गेट येथूनच जात असल्याने त्यानुसारच मूर्तीची उंची गणेश मंडळांनी ठेवायाची आहे.
एक खिडकी प्रणाली –
सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या या एकाच ठिकाणाहुन मिळाव्या यासाठी एक खिडकी प्रणाली सुरु करण्यात येणार असुन गणेशोत्सव सुरु होण्याच्या 2 दिवस आधी ती बंद होणार आहे. ज्या मंडळांनी ठराविक काळात परवानगी घेतली नाही त्यांना परवानगी मिळणार नाही. one window system for ganesh mandals
दुकानांवर व पावतीवर मूर्तीचा प्रकार लिहणे आवश्यक –
मूर्ती विक्रेत्यानां त्यांच्या दुकानाच्या पाटीवर तसेच विक्रीच्या पावतीवर मूर्ती मातीची आहे अथवा पीओपीची आहे हे लिहणे बंधनकारक आहे.मातीची सांगुन पीओपी मूर्ती विकल्यास त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. ganesh idol height limit municipal order










