Criminal detained under MPDA Act । 🛑चंद्रपुरातील २१ गुन्ह्यांचा बादशाह अखेर पोलिसांच्या जाळ्यात – MPDA कारवाईचा मोठा धक्का!

Criminal detained under MPDA Act । 🛑चंद्रपुरातील २१ गुन्ह्यांचा बादशाह अखेर पोलिसांच्या जाळ्यात – MPDA कारवाईचा मोठा धक्का!

Criminal detained under MPDA Act

Criminal detained under MPDA Act : चंद्रपूर – २१ गुन्हे दाखल असून सुद्धा गुन्हेगारी कार्य सतत सुरु असल्याने चंद्रपूर पोलिसांनी कुख्यात चोर व गुन्हेगारावर MPDA कायद्यांतर्गत १ वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध केले आहे. ३० वर्षीय संगम संभाजी सागोरे राहणार मित्र नगर आंबेडकर कॉलेज जवळ चंद्रपूर असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे.

संगम सागोरे वर पोलीस स्टेशन बल्लारशा, रामनगर, पडोली, भद्रावती मध्ये जबरी चोरी, अग्निशस्त्र, जाळपोळ व अश्लील शब्दात शिवीगाळ, खून, खुनाचा प्रयत्न करणे असे तब्बल २१ गुन्हे दाखल आहे. यांनतर सुद्धा संगम हा परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम करीत असल्याने त्याच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.

चंद्रपूरच्या रस्त्यावर हातात कोयता घेऊन दहशत, पोलिसांनी केली अटक

संगम सागोरे वर वेळोवेळी चंद्रपूर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केल्यावर सुद्धा तो कायद्याला जुमानत नसल्याने पोलिस अधीक्षकांनी याबाबत दखल घेत सागर वर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हात भट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती द्रकश्राव्य कलाकृती विना परवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर अत्यावश्यक वस्तूचा काळाबाजार करणारा व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा अधिनियम सण १९८१ सुधारणा अनव्ये २००९, २०१५ प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे सादर केला. police action under preventive detention act

कारागृहात स्थानबद्ध

जिल्हाधिकारी गौडा यांनी याबाबत दखल घेत संगम सागोरे ला नमूद कायद्यांतर्गत १ वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचा आदेश ३० जून रोजी पारित केला, संगम सागोरे ला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह मध्ये स्थानबद्ध करण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव, नयोमी साटम, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख, पोउपनि उपरे, अनिल जमकातन, सपोनि योगेश खरसान, अरुण खारकर, सुधीर मत्ते व परवरीश शेख यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment