Journey of Panther Sports Academy Champions । 🔥 पँथर्स स्पोर्ट्सचा ‘गुरुपौर्णिमा’ कार्यक्रम ठरला प्रेरणादायी! १० हून अधिक विजेत्यांचा सत्कार

Journey of Panther Sports Academy Champions । 🔥 पँथर्स स्पोर्ट्सचा ‘गुरुपौर्णिमा’ कार्यक्रम ठरला प्रेरणादायी! १० हून अधिक विजेत्यांचा सत्कार

Journey of Panther Sports Academy Champions

Journey of Panther Sports Academy Champions : चंद्रपूर: १२ जुलै २०२५ रोजी पँथर्स स्पोर्ट्स फाऊंडेशनने गुरुपौर्णिमे निमित्त गुरु आणि शिष्यांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात खेळाडूंच्या गुणवत्तेला आणि गुरूंना आदराने गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुरलीधर बागला हायस्कूलचे प्राचार्य श्री. उमेश पंधरे सर उपस्थित होते. त्यांच्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर भैया रायपुरकर, मनसे जिल्हाप्रमुख श्री. मनोज तांबेकर, तसेच पालक प्रतिनिधी म्हणून श्री. अमित अग्रवाल सर, श्री. जगन दुर्गम सर, सौ. प्रशांती दुर्गम मॅडम, सौ. हिना दरबार मॅडम, श्रीमती. पद्मा पांडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. खेळाडू विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.

चंद्रपूर जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

यावेळी, पँथर्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चंद्रपूर जिल्हा आणि राज्याचे नाव उज्वल केलेल्या पदक विजेत्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हा व राज्यस्तरीय पदक विजेत्यांमध्ये कु. मानसी गजेंद्रसिंह दरबार, कु. श्रुती जगन दुर्गम, कु. निर्जला अनिल कराडे, कु. रिया नवनीत कातकर, कु. चहक अमित अग्रवाल, कु. काजल पवन देवांगन, कु. रेशमी सुखदेव देवांगन, कु. यामिनी रवी देवांगन, कु. शगुन राकेश चौहान यांचा समावेश होता. मुलांमध्ये पूर्वेश अमित अग्रवाल, आलोक जगन दुर्गम, राजकुमार राकेश चौहान यांचाही गौरव करण्यात आला. taekwondo championship winners 2025

taekwondo championship winners 2025

पँथर्स स्पोर्ट्स अकॅडमीसाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा ठरला, कारण राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या कु. रिया नवनीत कातकर, आंतरराष्ट्रीय निवड प्रक्रियेसाठी निवड झालेल्या आदित्य बाजीराव निकालजे, राष्ट्रीय ग्रेपलिंग स्पर्धा जयपूरसाठी निवड झालेल्या कु. मानसी गजेंद्रसिंह दरबार आणि कु. श्रुती जगन दुर्गम यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी पदक विजेत्या आणि AIU खेलो इंडियासाठी निवड झालेल्या कु. रिया नवनीत कातकर हिचेही कौतुक झाले. sports academy achievements

७ वर्षाची चहक मुख्य आकर्षण

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली ती अवघ्या ७ वर्षांची कु. चहक अमित अग्रवाल, जिने जिल्ह्यात सुवर्णपदक जिंकून नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिपसाठी निवड मिळवली. तिच्या या यशाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

उपस्थित मान्यवरांनी खेळाचे फायदे, पँथर्स स्पोर्ट्स अकॅडमीचे अथक प्रयत्न आणि त्यांच्या यशाबद्दल खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पँथर्स स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले कुस्ती NIS कोच श्री. मुकेश पांडे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. अकॅडमीतील सर्व खेळाडूंच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Sharing Is Caring:

Leave a Comment