LCB action on illegal liquor storage
LCB action on illegal liquor storage : चंद्रपूर – सध्या जिल्ह्यात डुप्लिकेट दारूचा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरु आहे, दारू असली कि नकली हे फक्त पिणारा सांगू शकतो, व्यापारी फक्त पैश्यासाठी जिल्ह्यात डुप्लिकेट दारूचा पुरवठा करीत आहे. या दारूमुळे जिल्ह्यात एकदिवस मोठी जीवितहानी होऊ शकते अशी शक्यता आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील दारूचा साठा बाबुपेठ मधील एका इसमाने आपल्या घरी विक्री करीता साठवून ठेवला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने छापामार कारवाई करीत अवैध दारू साठवून ठेवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या.
चंद्रपूर – घुग्गुस मार्गाची दयनीय अवस्था
जिल्ह्यात सध्या अंमली पदार्थ तस्करी, सुगंधित तंबाखू व इतर अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मोहीम सुरु आहे, याबाबत पोलीस पथकाला दारूच्या साठ्याबाबत माहिती मिळाली, माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने बाबुपेठ आंबेडकर नगर येथे धाड मारीत कारवाई केली. या कारवाईत देशी विदेशी दारू साठ्यासह एकूण १० लक्ष ७४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. police raid on illegal liquor in Chandrapur
मध्यप्रदेश राज्यातील दारू
आंबेडकर नगर बाबुपेठ मध्ये राहणारा श्रीनिवास नरहरी याने आपल्या घरी विक्रीकरिता महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यातील दारूसाठा साठवून ठेवला होता, स्थानिक गुन्हे शाखेने माहितीच्या आधारे नरहरी यांच्या घरी धाड मारली. या धाडीत देशी विदेशी दारूच्या ४९ पेट्या किंमत ४ लाख ७६ हजार ९२० रुपये, दारू विक्रीतून मिळालेली रक्कम ९७ हजार रुपये, दारू वाहतुकीकरिता वापरलेले चार चाकी वाहन क्रमांक एमएच ३२ वाय ०९२६ किंमत ५ लाख व एक धारदार लोखंडी तलवार किंमत ५०० रुपये असा एकूण १० लाख ७४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी श्रीनिवास नरहरी वर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दारूबंदी कायदा व भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. liquor smuggling from Madhya Pradesh to Maharashtra

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता व अपर्णा मानकर यांनी केली.










