MLA Kishor Jorgewar stops ZP building work
MLA Kishor Jorgewar stops ZP building work : चंद्रपूर – लोकशाहीत लोकभावनेचा आदर केला गेला पाहिजे. रामबाग येथील सात एकर जागेवर जिल्हा परिषदेच्या ईमारतीला स्थानिकांचा विरोध असतांनाही येथे वृक्षतोड करुन कामाला सुरवात करणे ही योग्य बाब नाही. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सात एकर तर दूर येथील सात इंच जागेलाही आम्ही हात लावू देणार नाही असा ईशारा देत येथे सुरु असलेले काम आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी प्रत्यक्ष पाहणी करत बंद पाडले आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषद देणार दरमहा दहा हजार, काय आहे शिका व कमवा योजना?
या पाहणीदरम्यान महसुल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांगडे, उपविभागीय वन अधिकारी नायगावकर, जिल्हा परिषदेच्या उप अभियंता जोशी, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, दशरथसिंह ठाकूर, तुषार सोम, प्रकाश देवतडे, मंडळ अध्यक्ष अॅड, सरिता संदुरकर, मनोरंजन रॉय, राशिद हूसेन, राकेश बोमनवार, सज्जद अली, करणसिंह बैस, नितिन शाहा, रजनी पॉल आदिंची उपस्थिती होती. political leader halts construction due to protest
रामबाग येथे होणाऱ्या जिल्हा परिषद इमारतीला स्थानिक नागरिकांचा होत असलेला विरोध लक्षात घेता, आमदार किशोर जोरगेवार यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रशासकीय यंत्रणेला हे काम थांबविण्यास भाग पाडले होते. त्यानंतर त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांची भेट घेऊन रामबाग मैदानावर इमारत बांधण्याचा प्रस्तावच रद्द करण्याची मागणी केली होती. याबाबत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. mla kishor jorgewar stops zp building work
अधिकाऱ्यांना फटकारले
मात्र सदर बैठक होण्याआधीच जिल्हा परिषदेच्या ईमारतीसाठी रामबाग मैदाना लगतची जागा निश्चित करुन येथील जवळपास 60 मोठी झाडे तोडण्यात आली आहे. कंत्राटदाराने ईमारत बांधकामाचे सर्व साहित्य येथे टाकले असून कामास सुरवात केली आहे. याबाबत आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर जागेवर जात अधिका-यांसह कामाची पाहणी करत काम बंद पाडले आहे. झाडे तोडल्याबदलही आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना चांगलेच फटकारले आहे. ram bagh chandrapur tree cutting issue
लोकशाहीमध्ये लोकांच्या भावना सर्वोच्च असतात. या ठिकाणी नागरिकांचा स्पष्ट विरोध असतानाही वृक्षतोड करून कामास सुरुवात करणे ही बाब दुर्दैवी आहे, असे सांगत ही जागा जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी नाहीच. अनेक वर्षांपासून या जागेवर स्थानिक नागरिक आपला विरंगुळा शोधतात. झाडांमुळे निसर्गसंपन्न झालेला हा परिसर नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनाचा भाग आहे. अनेक खेळाडुंसाठी हे उत्तम मैदान आहे. यावर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही. असे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट शब्दात खडसावले आहे. संबधित कंत्राटदाराने 48 तासाच्या आत येथील ईमारत बांधकाम साहित्य दुसरीकडे हलविण्याचे निर्देशही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना दिले आहे. यावेळी स्थानिक नागरिकांचीही उपस्थिती होती.










