Nomadic Pardhi tribal children vaccination । लसीकरणाच्या विरोधात उभा समाज… पण आरोग्य यंत्रणेनं जिंकला विश्वास!

Nomadic Pardhi tribal children vaccination । लसीकरणाच्या विरोधात उभा समाज… पण आरोग्य यंत्रणेनं जिंकला विश्वास!

Nomadic Pardhi tribal children vaccination

Nomadic Pardhi tribal children vaccination : चंद्रपूर 22 जुलै – शिवमंदिर परिसर, अष्टभुजा वार्ड येथे झोपडी उभारून अगदी काही काळ वास्तव्यास असणाऱ्या, भटकी पारधी जमातीतील लसीकरणापासुन वंचित असलेल्या बालकांचे चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत लसीकरण करण्यात आले. लसीकरणाबाबत असलेला त्यांचा विरोध व गैरसमज दूर करतांना आलेल्या अडचणींचा सामना करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात आली.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपची सत्ता, शिंदेने कांग्रेसला केले गारद

  या समाजामध्ये लसीकरणाबाबत भीती होती की, “बाळ लसीकरण केल्यावर आजारी पडते,” म्हणून अनेक कुटुंबे लसीकरण टाळत होती. आरोग्य विभागामार्फत याआधी दोनदा प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या, मात्र संबंधित कुटुंबे घरी न सापडल्यामुळे प्रयत्न अपूर्ण राहिले. Chandrapur temporary shelter vaccination

  त्यामुळे मंगळवार 22 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता, आरोग्य विभागाच्या टीमने तात्काळ भेट देत, त्या ठिकाणी वसलेल्या 40-42 तात्पुरत्या झोपड्यांमध्ये जाऊन जनजागृती केली. प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधून, लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांच्या भीतीचे निरसन करण्यात आले. त्यानंतर लगेचच सुटलेली बालके ओळखून त्यांचे लसीकरण करण्यात आले.


   प्रतिकूल परिस्थितीत, समज-गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर योग्य समुपदेशनाद्वारे सकारात्मक बदल घडविणे हे आरोग्य यंत्रणेच्या तातडीच्या, सहानुभूतीपूर्ण आणि चिकाटीच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले.आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, लसीकरण क्षेत्र निरीक्षक सारिका गेडाम व बगडखिडकी येथील शहरी प्राथमीक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांद्वारे सदर मोहीम राबविण्यात आली.  

आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी अभिनंदनास पात्र

“हे काम म्हणजे आरोग्य यंत्रणेसाठी तारेवरच्या कसरतीसारखे होते. समाजाच्या विश्वासास पात्र ठरत, योग्य समुपदेशनाने लसीकरणासारखा संवेदनशील मुद्दा  सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्येही स्वीकारला गेला त्याबद्दल आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत ” – आयुक्त विपीन पालीवाल

Sharing Is Caring:

Leave a Comment