use of AI in municipal administration । “सरकारी कामकाजात ChatGPT, Canva, Myca AI चा वापर! काय आहे चंद्रपूर पॅटर्न?”

use of AI in municipal administration । “सरकारी कामकाजात ChatGPT, Canva, Myca AI चा वापर! काय आहे चंद्रपूर पॅटर्न?”

use of AI in municipal administration

use of AI in municipal administration : चंद्रपूर १२ जुलै – राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या “150 दिवस कार्यक्रम” अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेने प्रशासनात नावीन्यपूर्ण बदल घडवून आणत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर विविध विभागांमध्ये सुरू केला आहे. यामुळे नागरिक सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी होण्यास मदत मिळत आहे. AI initiatives under 150 day governance program

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालात धक्कातंत्र

   मागील काही दिवसात एआयची मदत घेऊन कोण-कोणत्या विभागात कशापद्धतीने बदल घडवून कामाची गती वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत. मनपाच्या प्रत्येक विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांच्या विभागाचे काम कसे सुलभ करता येईल तसेच काय नावीन्यपूर्ण बदल करता येईल याचे पीपीटीद्वारे सादरीकरण आयुक्तांपुढे केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा कल्पक वापर करणाऱ्या विभागांना पुरस्कृत करण्यात येणार आहे.

        बांधकाम विभाग,पाणी पुरवठा विभाग,यांत्रिकी,कोर्ट विभाग,जनसंपर्क विभाग,आस्थापना,निवडणूक,स्टोर विभाग, अतिक्रमण ,नगर रचना,आरोग्य,स्वच्छता,ग्रंथालय ,संगणक , शिक्षण विभाग,विद्युत विभाग,समाज कल्याण ,अग्निशमन विभाग इत्यादी सर्व विभागाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

जलद गतीने माहिती उपलब्ध होणार

   Chat-GPT,Claude ने शासकीय कामकाजाच्या टिपणी, पत्र, नोंद, संशोधन याबाबत मार्गदर्शन घेऊन काम जलद गतीने करण्यास मदत होते.‌ Notebook LM वापर शासकीय पुस्तक, जीआर किंवा माहिती असलेले कागदपत्र अपलोड करुन संक्षिप्त प्रश्नांची उत्तरे जलद गतीने शोधुन मिळण्यास मदत होते.‌ Canva व Gama चे वापर करून शासकीय कामकाजाचे पीपीटी करण्यास मदत होते आहे‌. Myca AI वापर मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी निगडीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तसेच उपचार घेण्यासाठी फायदा होतो.

   150 दिवस कार्यक्रम हे केवळ एक उद्दिष्ट नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बदल घडवण्याची दिशा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न आहे  – आयुक्त विपीन पालीवाल

Sharing Is Caring:

Leave a Comment