Truck collapses under Belora bridge । दुर्दैवी घटना, तो ५ तास मृत्यूशी लढला

Truck collapses under Belora bridge । दुर्दैवी घटना, तो ५ तास मृत्यूशी लढला

Truck collapses under Belora bridge

Truck collapses under Belora bridge : घुग्घुस: आज सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास वर्धा नदीवरील बेलोरा पुलावरून चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीचा १८ चाकी ट्रक (क्रमांक MH34 BZ 1402) अनियंत्रित होऊन ७० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक राजा यादव गेल्या पाच तासांपासून केबिनमध्ये अडकून जीवन-मरणाशी झुंज देत होता. त्याला वाचवण्यासाठी शासन-प्रशासन, वेकोली प्रशासन, चड्डा कंपनी आणि स्थानिक नागरिकांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते.

चंद्रपुरात बनावट देशी दारूची वाहतूक

वेकोली प्रशासनाने गॅस कटर, हायड्रा मशीन, ऑक्सिजन मशीन, व्हेंटिलेटर आणि डॉक्टर्ससह सर्व आपत्कालीन सुविधा घटनास्थळी बोलावून चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर शिरपूर पोलीस आणि घुग्घुस पोलिसांनीही केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्यासाठी पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि इतर तत्पर सेवा पुरवत सहकार्य केले. Big accident

अखेर घटनेला पाच तास उलटल्यानंतर, केबिनमध्ये अडकलेल्या घुग्घुस शास्त्रीनगर येथील रहिवासी ट्रक चालक राजा यादव यांनी घुग्घुस वेकोलीच्या राजीव रतन दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला.

शिरपूर पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांच्या प्रयत्नाने वणी नगर परिषदेतून केबिन कापण्यासाठी स्पायडर कटर मशीन मागवण्यात आले होते. तसेच घुग्घुस पोलीस ठाण्याचे एपीआय पाटील यांनीही चालकाला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते.

५ तासाच्या मरण यातना

वेकोलीचे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस दल गेल्या पाच तासांपेक्षा अधिक काळ घटनास्थळी उपस्थित राहून भूक-तहान विसरून उन्हात उभे राहून जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते.

पण नशिबात लिहिलेल्या मृत्यूला कोण टाळू शकतं! अखेर राजाला वाचवण्याच्या प्रयत्नांतील अपयशामुळे उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

IMG 20250724 WA0003

कुटुंबीयांनी दवाखान्यात पोहोचून चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीकडून नुकसानभरपाईची मागणी केली.

घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास घुग्घुस पोलीस करत आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment