Ahetesham Ali joins Congress
Ahetesham Ali joins Congress : चंद्रपूर : चंद्रपूर -वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यशैलीवर प्रेरित होवून वरोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, भाजपचे माजी जिल्हा सचिव तसेच भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अहेतेशाम अली यांनी समर्थकांसह काँग्रेसमध्ये रविवारी पक्षप्रवेश केला. नागपूर येथील प्रेस क्लबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
Also Read : खासदार धानोरकर यांच्या मागणीवर ताडोबा प्रशासन नरमल, स्थानिकांना जंगल सफारी मध्ये सवलत
मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल २१ हजारांहून अधिक मते मिळवून अहेतेशाम अली यांनी आपला मजबूत जनाधार सिद्ध केला होता. एनएसयूआय व युवक काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करून ते वरोरा शहर काँग्रेसचे अध्यक्षही राहिले. मात्र, २०१४ साली माजी मंत्री स्व. संजय देवतळे यांच्या सोबत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. गेली दहा वर्षे ते भाजपमध्ये सक्रिय होते. २०१६ च्या वरोरा नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून जिल्ह्यातील सर्वाधिक मतांनी नगराध्यक्षपद मिळवले होते. Warora Bhadrawati political news
लोकशाही वाचविण्यासाठी कांग्रेस पक्षात प्रवेश
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सर्वसमावेशक कार्यशैलीवर प्रभावित होऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लोकशाही वाचविण्याच्या लढ्यात सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. Pratibha Dhanorkar leadership
यावेळी भद्रावती भाजपा तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, दादापाटील झाडे (संचालक, नंदोरी सेवा सहकारी संस्था), अशरफ खान (जिल्हा महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माजरी), आशिष ठाकरे, बंडूभाऊ लभाने, सादिक अली, शाहिद अली, धर्मेंद्र हवेलीकर, अनिल खडके (माजी सरपंच), मारोती झाडे (माजी सरपंच, टेमुर्डा), गणेश जोगी (ग्रामपंचायत सदस्य, फत्तापूर), जयंत चंदनखेडे, सुभाष वाटकर (पंचायत समिती प्रमुख, बोर्डा), सौ. चंद्रकलाताई मते (अध्यक्ष, महिला गुरुदेव सेवा मंडळ, वरोरा), जितुभाऊ कांबळे (ग्रामपंचायत सदस्य, बोर्डा) यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष अली हे भाजप पक्षातून निलंबित असले तरी त्यांचे पक्षात मोठे स्थान होते.
अहेतेशाम अली यांच्यासह समर्थकांच्या काॅंग्रेस प्रवेशामुळे वरोरा-भद्रावतीसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळ मिळणार असून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हात आणखी बळकट होणार आहेत.










