Baba Shri Shyamji Temple Khutala Chandrapur :
Baba Shri Shyamji Temple Khutala Chandrapur : चंद्रपूर 20 ऑक्टोबर (News 34 वृत्तसेवा) – चंद्रपूर शहराजवळील खुटाळा गावात बाबा श्री श्यामजी यांच्या भव्य मंदिर निर्माण कार्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.
विशेष म्हणजे या पवित्र धार्मिक मंदिराच्या निर्माण कार्यासाठी यशश्री सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा ललित कासट यांनी आपली स्वतःची जमीन दान दिली आहे.
Also Read : भयावह, 70 वर्षीय शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
बाबा श्री श्यामजी यांचं मंदिर पडोली एमआयडीसी मार्ग, खुटाळा मध्ये निसर्गाच्या सानिध्यात तयार होणार आहे, यामुळे त्याठिकाणी नागरिकांना धार्मिक वातावरण अनुभवायला मिळणार.

नागरिकांनी उपस्थित रहावे
आयोजित मंदिर निर्माण भूमिपूजन कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आमंत्रण जय श्री श्याम सेवा समिती चंद्रपूरचे अध्यक्ष ललित कासट व सचिव कुंजबिहारी परमार यांनी केले आहे.










