Bachchu Kadu farmers agitation update । नागपूरला जायचयं? तर मग हि माहिती वाचा

Bachchu Kadu farmers agitation update । नागपूरला जायचयं? तर मग हि माहिती वाचा

Bachchu Kadu farmers agitation update

Bachchu Kadu farmers agitation update : चंद्रपूर २९ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, कर्जमाफी व दिव्यांग बांधवाना न्याय मिळावा अश्या विविध मागणीसाठीप्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी नागपूर जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे, जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीतर रेल्वे रोको आंदोलन करणार असा इशारा कडून यांनी दिला आहे.

Also Read : गुन्हेगारीमुक्त चंद्रपूरसाठी पोलिसांचे मोठे पाऊल

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा नागरिकांना फटका बसू नये याकरिता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना नागपूर जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी दुसरा मार्ग सुचविला आहे. या दुसऱ्या मार्गाने नागरिक नागपुरात दाखल होऊ शकतात.

या पर्यायी मार्गाचा करा वापर

जामठा या ठिकाणी आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणावर आंदोलनासाठी बसले असल्यामुळे बुटीबोरी जिल्हा नागपूर येथे खूप मोठा ट्राफिक जाम झाला आहे. त्यामुळे नागपूरकडे जाणे शक्य नाही, फक्त वर्धा पर्यंत जाऊ शकतात.
नागपूर जाणाऱ्या नागरिकांनी वरोरा आनंदवन चौक मार्गे चिमूर -भिसी उमरेड मार्गाने नागपूर जाता येईल. करिता नागरिकांनी त्या मार्गाचा वापर करावा. असे पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर तर्फे नागरिकांना कळविण्यात आले आहे.

Diwali ad

मागील १८ तासापासून सुरु असलेल्या शेतकरी, भूमिपुत्रांच्या आंदोलनाला राज्यातुन समर्थन प्राप्त होत आहे, सध्या नागपुरातील महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून ठेवले आहे, सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीवर तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आंदोलन अधिक मोठे होणार असा इशारा देण्यात आला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment