Bahujan Hitkarini Sabha leadership
Bahujan Hitkarini Sabha leadership : चंद्रपूर 18 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – फार पूर्वी आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर शिदोरी घेऊन यायचे, आता येथून शिदोरी घेऊन जातात. ज्यांचे चळवळीशी काही नाते नाही, विरोधक आहेत, तेही भोजनदान देतात, काही प्रस्थापित गित- संगीत स्पॉन्सर करतात, तिकडे गर्दी करणारे धम्म मंचाकडे पाठ फिरवितात, या प्रस्थापिताना हा मंच बेधडक उपलब्ध होत राहिला, परंतु यावर्षी प्रस्थापित पक्षांच्या पुढाऱ्यांचे राजकीय भाषण नकोच या भूमिकेला तरुणाईने उचलून धरले, परिणामता पुढे स्पॉन्सरशिप बंद होईल.
Also Read : सफाई कामगारांची दिवाळी गोड, आमदार जोरगेवार यांची मध्यस्ती
स्वावलंबन आणि स्वाभिमान जागृत होईल व चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीतून आंबेडकरी चळवळीचे पूर्ववैभव प्राप्त होण्यास सुरुवात होईल”, असे बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष नागवंश नगराळे यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. Ambedkarite unity movement
दीक्षाभूमी चंद्रपूर येथील महोत्सवातील दिनांक 16 ऑक्टो. च्या मुख्य समारंभास आठवले, अडबाले यांचा अपवाद वगळल्यास भाजप काँग्रेस च्या सर्वच नेत्यांनी मंचावर येण्याचे टाळले, त्याला’ राजकीय भाषण नकोच’ ही भूमिका कारण असल्याचे बोलल्या जात आहे, हे येथे विशेष महत्वाचे आहे.
हे आंबेडकरी तरुणाईचे यश
मुख्य समारंभाचे लाईव्ह प्रक्षेपण सुरु असताना केंद्रीय राज्यमंत्री नाम. रामदास आठवले हे थोडक्यात भाषण आटपून निघून गेले. आम. अडबाले यांनी खाजगीकरणाच्या धोरणावरून अप्रत्यक्ष भाजप कांग्रेसवर टिका करताना बाबासाहेब व संविधानाचा संदर्भ जोडला , ते स्वागतयोग्य होते. मात्र भाजप काँग्रेसचे इतर मुख्य नेते मंचावर नदारद होते, हे बघून आपल्या प्रयत्नाला यश आल्याचे अनेक फोन आले याचे खरे श्रेय आंबेडकरी तरुणाईला आहे, असे नगराळे पुढे म्हणाले. Ambedkarite social change Maharashtra
” अभेद्य एकता आणि स्वाभिमानी चळवळ या बळावर आंबेडकरी समूहाने बहुजनांना हक्क मिळवून दिले आणि संविधानिक हक्क – अधिकार टिकविले. परंतु स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काही नेते प्रस्थापित पक्षांच्या वळचनीला गेल्याने अभेद्य आंबेडकरी एकता नष्ट झाली आहे, याचे शल्य सतत सर्वांना बोचत आहे, परंतु आंबेडकरी तरुणाईने ‘ प्रस्थापित पक्षांच्या पुढाऱ्यांची राजकीय भाषणे नकोच ‘ या भूमिकेला उचलून धरल्याने दीक्षाभूमी व्यवस्थापनाला सुद्धा’ पुढील वर्षी या पुढऱ्यांना निमंत्रित केले जाणार नाही व समाजाला विश्वासात घेऊन नियोजनात आमूलाग्र बदल केल्या जाईल’, अशी भूमिका घ्यावी लागली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातून निकटच्या भविष्यात आंबेडकरी एकतेला सुरुवात होईल असा आशावादही या पत्रकात नगराळेनी व्यक्त केला आहे.










