Chandrapur Crime Control । गुन्हेगारीमुक्त चंद्रपूरसाठी पोलिसांची कारवाई; गुन्हेगाराला केले स्थानबद्ध

Chandrapur Crime Control । गुन्हेगारीमुक्त चंद्रपूरसाठी पोलिसांची कारवाई; गुन्हेगाराला केले स्थानबद्ध

Chandrapur Crime Control

Chandrapur Crime Control : चंद्रपूर २८ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी गुन्हेगारी प्रवृत्तीपासून मोकळा श्वास घ्यावा यासाठी चंद्रपूर पोलीस सराईत गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्याची कारवाई करीत आहे. २८ ऑक्टोबर रोजी ४३ वर्षीय महेंद्र आनंदराव ढुमणे विरोधात एमपीडीए अधिनियम अंतर्गत १ वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

Also Read : चंद्रपुरात पुन्हा एमडी पावडर जप्त

महेंद्र ढुमणे यांच्याविरोधात एकूण ६ गुन्ह्यांची नोंद होती, यामध्ये अवैध दारूविक्री, खुनाचा प्रयत्न करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे, गंभीर दुखापत व मारहाण करणे, शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, स्वतःकडे अवैध अग्निशस्त्र बाळगून धाक दाखविणे इत्यादी चढत्या क्रमाने गुन्हे नोंद आहे. Chandrapur Police Action

कारवाई नंतरही सुधारणा नाही

रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत कुणीही ढुमणे विरुद्ध तक्रार करण्याची हिम्मत दाखवीत नाही, आपल्या साथीदारांसह परिसरात दहशत पसरविण्याचे काम ढुमणे करीत होता, त्याचेवर तडीपारीची व प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती मात्र त्यानंतर सुद्धा ढुमणे यांच्या वृत्तीत कसलीही सुधारणा झाली नसल्याने चंद्रपूर पोलिसांनी वर्षभरासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले, रामनगर पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि योगेश खरसाण, पोउपनि सुरेंद्र उपरे, पोलीस कर्मचारी संजू देशवाले, अरुण खारकर, परवेज शेख, अनिल जमकातण, राजू चिताडे, मनीषा मोरे, ब्लूटी साखरे यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment