Chandrapur crime hotspot police patrol
Chandrapur crime hotspot police patrol : चंद्रपूर 24 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – 22 ऑक्टोबर च्या रात्री चंद्रपुरातील लॉ कॉलेज परिसरात 27 वर्षीय नितेश ठाकरे या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आरोपीच्या मनात मृतकबद्दल इतका राग होता की त्यांनी नितेश च्या पोटाचा अक्षरशः कोथडा बाहेर काढला होता.
Also Read : दिवाळी आहे, मला कपडे हवे, कपडे नाही पण त्याचा कोथडा काढला, युवकाची हत्या
सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे अवघ्या 1 तासात हत्याकांडाचा उलगडा करीत 6 आरोपींना अटक केली.
चंद्रपुरातील असे अनेक निर्जन ठिकाण आहे जिथे अनेक गुन्हेगारी कार्य सुरू असते, तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी गुन्हेगारी वृत्तीवर आळा बसावा याकरिता शहरातील निर्जन ठिकाणी नियमित पेट्रोलिंग सुरू केली होती. Chandrapur crime capital
परदेशी यांची बदली झाली आणि पुन्हा जैसे थे ची स्थिती निर्माण झाली, विशेष बाब म्हणजे तुकुम परिसरातील अतिक्रमण परदेशी यांच्या काळात काढण्यात आले होते, मात्र आज तुकुम हे पूर्वीसारखे झाले, कुणाचेही लक्ष त्याठिकाणी नाही.
चंद्रपुरातील निर्जन परिसर
शहरातील लॉ कॉलेज परिसर, बाबूपेठ भागातील डीएड कॉलेजच्या मागील भाग, रामाला तलाव, डॉ.आंबेडकर कॉलेजच्या मागे, दाताला पूल, रामनगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या समोरील भाग असे अनेक निर्जन ठिकाण शहरात आहे ज्याठिकाणी पोलिसांची नियमित गस्त आवश्यक आहे.
लॉ कॉलेज परिसरात सायंकाळ पासून दारू, नशा असे अनेक प्रकार सुरू असतात मात्र त्याठिकाणी पोलिसांची पेट्रोलिंग आता नाममात्र झाली आहे. जर पोलीस नियमितपणे शहरातील निर्जन स्थळी गस्तीचे प्रमाण वाढवतील तर गुन्हेगारीवर काही प्रमाणात आळा नक्की बसणार, मात्र सध्यातरी अशी परिस्थिती चंद्रपुरात नाही.
सध्या जिल्हा क्राईम कॅपिटल बनत आहे, एमडी पावडर, असंख्य शस्त्र सहज उपलब्ध होऊ लागले आहे, गुन्हेगारी वाढत आहे, मात्र यावर पोलीस विभागाचे नियंत्रण नसल्यासारखे आहे.
पोलीस विभाग नियमित पणे लॉ कॉलेज परिसरात गस्त करीत असते तर कदाचित नितेश चा जीव वाचला असता.
काही दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरात 4 युवकांना बंदूक, माऊझर व खंजर सहित अटक करण्यात आले होते, या प्रकरणातील आरोपी हे मोठा घातपात करण्यासाठी शहरात आले, पोलिसांनी त्यांना आधीच अटक करीत त्यांचा डाव उधळून लावला. शहरात शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असताना सुद्धा पोलिसांना याबाबत तिळमात्र माहिती का बरं मिळत नाही हा एक न सुटलेला प्रश्नच आहे.










