Chandrapur police action on habitual offender
Chandrapur police action on habitual offender : चंद्रपूर 21 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – 15 ते 20 गुन्हे दाखल असलेल्या चंद्रपूर शहरातील अट्टल गुन्हेगारांवर चंद्रपूर पोलिसांनी वर्षभराकरिता कारागृहात स्थानबद्ध केले आहे. 23 वर्षीय आनंद उर्फ गुड्डू रवींद्र गेडाम राहणार मित्रनगर चंद्रपूर असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे.
आनंद गेडाम वर वर्ष 2020 ते 2025 या कालावधीत पोलीस ठाणे रामनगर व इतर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांव्ये तब्बल 15 ते 20 गुन्हे दाखल आहे. विशेष म्हणजे गेडाम वर प्रतिबंधक कारवाई कारवाई करण्यात आली होती, मात्र त्या कालावधीत गुन्हे केल्याने बॉण्ड रद्द करण्यात आला. Maharashtra police law enforcement success
Also Read : 6 तासात घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा
आनंद गेडाम वर दरोडा, जबरी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत व मारहाण करणे, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, अवैध अग्निशस्त्र बाळगत दहशत निर्माण करणे, आग लावून जाळपोळ करणे असे अनेक चढत्या क्रमाचे गुन्हे दाखल आहे.
दहशत इतकी की नागरिक तक्रार करायला घाबरत होते
विशेष बाब म्हणजे आनंद गेडाम विरुद्ध त्याच्या दहशतीमुळे कुणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हते, सदर गुन्हेगारी वृत्तीवर आळा बसावा यासाठी चंद्रपूर पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी हातभट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार, धोकादायक कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981, सुधारणा 2009, 2015 अनव्ये 1 वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश होण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालय यांचे आदेशनव्ये नमूद प्रस्तावित इसमास 1 वर्षकरिता स्थानबद्ध आदेश केल्याने आनंद गेडाम ला 18 ऑक्टोबर रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दाखल करीत स्थानबद्ध करण्यात आले असून पुढे त्यास सोलापूर कारागृहात दाखल करण्यात येणार आहे. Chandrapur criminal activity control
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप चौगुले, पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश खरसान प्रभारी पोलीस स्टेशन कोठारी, पोउपनी सुरेंद्र उपरे, पोलीस कर्मचारी संजू देशवाले, अरुण खारकर, परवेज शेख, अनिल जमकातन, राजू चिताडे, मनीषा मोरे, ब्ल्यूटी साखरे व स्थानिक पोलिसांनी केली.










