Chandrapur police drug bust MD powder
Chandrapur police drug bust MD powder : चंद्रपूर (NEWS ३४ वृत्तसेवा) – चंद्रपूर जिल्हा नशामुक्त व्हावा याकरिता जिल्हा पोलीस दल तत्पर असून अंमली पदार्थविरोधी मोहीम राबवित आहे, या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने सर्वात मोठी कारवाई करीत ५२८ ग्राम एमडी पावडर जप्त केले. तसेच ७ ऑक्टोबर रोजी दुर्गापूर पोलिसांनी ६० ग्राम एमडी पावडर व ३ आरोपीसह ११ लाख ६२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. MD powder seized Chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, जिल्ह्यात विविध ठिकाणी अंमली पदार्थ विकल्या जात आहे, विशेष बाब म्हणजे अनेक अल्पवयीन मुले या धंद्यात गुंतलेले आहे. जिल्ह्यात कधी नागपूर तर कधी मुंबई मार्गे एमडी पावडर ची वाहतूक होत आहे. चंद्रपूर पोलिसांच्या धडक मोहिम अंतर्गत नशेचा व्यापार करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु आहे.
Also Read : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ५२८ ग्राम एमडी पावडर जप्त
अकोला जिल्ह्यातील २ तर चंद्रपुरातील एका आरोपीला अटक
७ ऑक्टोबर रोजी दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तुकूम परिसरात काही इसम एमडी पावडरची विक्री करण्याकरिता येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता यावेळी २१ वर्षीय मुदसिर नासिर शेख हुकूम राहणार तुकूम, २४ वर्षीय शेख मुस्तफा शेख रहीम राहणार अकोला व ३९ वर्षीय अब्दुल राजे अब्दुल रशीद राहणार अकोला यांना ताब्यात घेत, त्यांच्याजवळून ६० ग्राम एम पावडर किंमत ४ लाख २० हजार जप्त केले.
यावेळी आरोपीजवळून एमडी पावडर सह चारचाकी वाहन किंमत ७ लाख रुपये, ४ मोबाईल किंमत २६ हजार रुपये, रोख रक्कम १६ हजार १६० रुपये असा एकूण ११ लाख ६२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कार्यवाही सदरची कामगिरी मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलिस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री प्रमोद चौगुले उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन दुर्गापूरचे ठाणेदार पो नी संदीप एकाडे पाटील यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रविण बिंकलवार, पो हवा योगेश शार्दुल, मंगेश शेंडे, रुपेश सावे, किशोर वलके, सोनल खोब्रागडे, मोरेश्वर गोरे यांनी केली.










