Chandrapur Police Latest News
Chandrapur Police Latest News : चंद्रपूर/दुर्गापूर १४ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा): चंद्रपूर पोलिसांनी (Chandrapur Police) एक महत्त्वपूर्ण कारवाई करत ऊर्जानगर हद्दीतून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील चोरीच्या मोटारसायकलसह एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी संदीप रामभाऊ पाटील (वय ४०, रा. कोंढी वार्ड क्रमांक ०५, ऊर्जानगर) याच्याकडून एकूण ५०,०००/- रुपये किंमतीच्या २ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
Also Read : पत्रकाराने महिलांना लावला चुना, नोकरीच्या नावाने फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या (Durgapur Police Station) हद्दीत चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या.
- पहिली घटना: CSTPS मेजर गेट ऊर्जानगर (Urjanagar) येथून दि. २०/०९/२०२५ चे २२:०० ते दिनांक २३/०९/२०२५ चे ०२:३० वा. दरम्यान मोटारसायकल चोरी झाली होती. याप्रकरणी अपराध क्रमांक २३६/२०२५ कलम ३०३ (२), भा. न्या. सं. (भारतीय न्याय संहिता) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
- दुसरी घटना: WCL कॉलनी शक्तिनगर, मेजर गेट ऊर्जानगर येथून दि. १७/०६/२०२४ चे १५:०० ते दिनांक १८/०६/२०२४ चे १२:०० वा. दरम्यान मोटारसायकल चोरी झाली होती. याप्रकरणी अप. क्रं. १८१/२०२४ कलम ३७९, भा.द.वि. (भारतीय दंड विधान) अंतर्गत गुन्हा दाखल होता. Chandrapur Police arrest motorcycle thief
या दोन्ही गुन्ह्यांतील चोरी केलेल्या २ मोटारसायकलसह आरोपी संदीप रामभाऊ पाटील याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यशस्वी कारवाई करणारे पथक
सदरची उल्लेखनीय कार्यवाही श्री मुम्मका सुदर्शन (पोलीस अधीक्षक, चंद्रपूर), श्री ईश्वर कातकडे (अपर पोलिस अधीक्षक, चंद्रपूर) आणि श्री प्रमोद चौगुले (उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक श्री संदीप एकाडे यांच्या नेतृत्वात पो. उपनि. प्रवीण बिनकलवार, पो. हवा. योगेश शार्दूल, ना. पो. अं. मोरेश्वर गोरे, पो. अं. मंगेश शेंडे, किशोर वलके, सोनाल खोब्रागडे आणि रुपेश सावे यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.










