Chandrapur Road Closure Update | चंद्रपूर शहरात आज आदिवासी समाजाचा महा आक्रोश मोर्चा; अनेक मार्ग बंद

Chandrapur Road Closure Update | चंद्रपूर शहरात आज आदिवासी समाजाचा महा आक्रोश मोर्चा; अनेक मार्ग बंद

Chandrapur Road Closure Update

Chandrapur Road Closure Update : विविध मागण्यांसाठी चंद्रपूर शहरात आदिवासी समाजाचा महा आक्रोश मोर्चा आज 13 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे, यामुळे नागरिकांनी शहरात येताना काळजी घ्यावी कारण मोर्च्यामुळे अनेक मार्ग बंद राहणार आहे.


सदर मोर्चा हा कोहिनुर ग्राउंड पासून सुरू होणार असून थेट अंचलेश्वर गेट, कस्तुरबा चौक, गांधी चौक, जयंत टॉकीज चौक जटपुरा गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निघणार आहे.
मोर्च्यात सामील होणाऱ्या नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी या मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. Chandrapur Aakrosh Morcha 2025

Also Read : राजुरा नगरपालिका, मतदार यादीतील घोळ कायम


विशेष म्हणजे ज्या मार्गावरून मोर्चा निघणार आहे तो मार्ग पूर्णतः नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आला आहे.
सकाळी 11 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत वाहतूक बंद चा आदेश अंमलात असणार आहे.

या पर्यायी मार्गाचा करा वापर


नागरिकांनी या कालावधीत जड वाहने वगळता अंचलेश्वर गेट ते गंजवार्ड कडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा, तसेच नागपूर व मूल कडून चंद्रपूर शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांनी पंचशील चौक, श्री टॉकीज चौक, पठाणपूरा परिसर वार्ड मध्ये जाणाऱ्या येणाऱ्या सर्व नागरिकांनी वरोरा नाका, मित्र नगर चौक, जेष्ठ नागरिक भवन, संत कंवलराम चौक, विदर्भ हाऊसिंग चौक, बिनबा गेट या मार्गाचा वापर करावा.


नागपूर व मूल शहरामधील रामाला तलाव, बगळ खिडकी, गंजवार्ड भानापेठ वॉर्ड मध्ये जाणाऱ्या सर्व नागरिकांनी सावरकर चौक, बस स्टॅण्ड चौक, आरटीओ ऑफिस, रयतवारी कॉलरी या मार्गाचा वापर करावा.

या ठिकाणी पार्क करा वाहने


आक्रोश मोर्च्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने महाकाली मंदिर समोरील बैल बाजार व महाकाली यात्रा ग्राउंड मध्ये पार्क करावी, त्यासोबतच मूल व नागपूर मार्गे येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने मूल रोडवरील एसबीआय चौक समोरील ग्राउंड व न्यू इंग्लिश ग्राउंड या ठिकाणी वाहने पार्क करावी.


नागरिकांनी चंद्रपूर पोलिसांतर्फे दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहणार नाही.

Sharing Is Caring:

Leave a Comment