Chandrapur Road Divider
Chandrapur Road Divider : चंद्रपूर २९ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालया पर्यंत दुभाजकाच्या प्रकरणाला आज एक वेगळेच वळण लागले. या वादग्रस्त दुभाजकाच्या विरोधात पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात आज बुधवार दि.29 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेदरम्यान आंदोलन करण्यात आले.आंदोलकांनी बांधकाम साहित्याची तोडफोड केली, काम बंद पाडले.
Also Read : नागपूरला जाण्यापूर्वी हि माहिती वाचा
आंदोलन सुरू असताना अचानक काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर आंदोलनस्थळी आले. माझ्या प्रभागातील काम बंद करता, दादागिरी करता,मला पत्र का दिले नाही ? आंदोलन कशाला करत आहात ? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी आंदोलकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. यावर देशमुख यांनी कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करू नका असे म्हणत नागरकर यांना सुनावले. Pappu Deshmukh
काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या भुमिकेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.नागरकर महाकाली प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक होते तर रस्ता दुभाजक पठाणपुरा प्रभाग क्रमांक 14 मध्ये आहे. त्यामुळे नागरकर यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल चर्चेला उधान आले आहे. दरम्यान देशमुख यांनी दुभाजकाची एक सळाख सहजपणे हाताने तोडून दाखवली. यावरून कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दुभाजकाचे काम रद्द करून रस्त्याचे काम करा.. आंदोलकांची मागणी
दुभाजकाचे काम रद्द करण्यात यावे, रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे व दुभाजकाच्या कामाची चौकशी करून भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी आंदोलकांची मागणी आहे.
या आंदोलनामध्ये मनसेचे पदाधिकारी मनोज तांबेकर, वर्षाताई भोमले, मंदाताई कराडे, प्रकाश चंदनखेडे,प्रगती भोसले, नेहा डुडलकर, कैलास पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रतिक चिकाटे, राजु पांडे जनविकास सेनेचे मनिषा बोबडे, इमदाद शेख,गोलू दखणे, प्रफुल बैरम,अमुल रामटेके,घनश्याम येरगुडे, अनिता पिसे,सचिन भिलकर,किशोर महाजन,देवराव हटवार,अरूणा मांदाळे,ललिता उपरे,माला गुरनुले,सुशिला चौधरी यांनी सहभाग घेतला.










