Ghuggus mobile snatching case
Ghuggus mobile snatching case : चंद्रपूर/घुग्गुस ७ ऑक्टोबर २०२५ (NEWS ३४ वृत्तसेवा) – सायंकाळच्या सुमारास जॉब वरून घरी परतणाऱ्या महिलेचा पाठलाग करीत अंधाराचा फायदा घेत एका अनोळखी इसमाने महिलेचे तोंड दाबत खाली पडले व तिच्याजवळील ५ मोबाईल हिसकावून पळून गेला. मात्र घुग्गुस पोलिसांनी अवघ्या २ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
Also Read : ६० ग्राम एमडी पावडर जप्त, दुर्गापूर पोलिसांची कारवाई
घुग्गुस शहरातील केबी खान कॉम्प्लेक्स समोरून घरी पायदळ जाणाऱ्या महिलेचा एका अनोळखी इसमाने पाठलाग केला व अंधाराचा फायदा घेत तिच्याजवळील मोबाईल हिसकावीत पळ काढला, घडलेल्या प्रकाराबाबत त्या महिलेने तात्काळ घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
बिहार राज्यातील आरोपी अटकेत
पोलीस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला, पोलीस निरीक्षक राऊत यांनी सदर गुन्ह्याचा छडा लावण्याकरिता पथक तयार केले, विशेष बाब म्हणजे सदर गुन्ह्यात कसलाही सुगावा नसताना अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करीत पोलिसांनी अवघ्या २ तासात २१ वर्षीय चंदन कुमार सहानी राहणार बिहार हल्ली मुक्काम खान कॉम्प्लेक्स घुग्गुस याला अटक केली. आरोपीकडून चिरी केलेला मोबाईल जप्त करण्यात आला. Ghuggus police fast crime action
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या नेतृत्वात सपोनि सचिन तायवाडे, सपोनि प्रफुल डाहुले, पोउपनि गणेश अनभुले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, अनिल बैठा, नितीन मराठे, प्रसनजीत डोर्लीकर, रवि वाभीटकर, महेश भोयर, विजय ढपकास व पवन डाखरे यांनी केली.










