Gondwana University mark sheet with percentage
Gondwana University mark sheet with percentage : चंद्रपूर ९ ऑक्टोबर २०२५ (News ३४ वृत्तसेवा) – गोंडवाना विदयापीठ गडचिरोली येथे नुकतीच शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत युवासेना च्या वतीने युवासेना पूर्व विदर्भ सचिव तथा गोंडवाना विदयापीठ सिनेट सदस्य यांनी विद्यार्थी, शिक्षक यांचे विविध प्रश्न मांडले यामध्ये विद्यार्थ्याच्या मार्कशीट वर CGPA सोबतच टक्केवारी (Percentage) चा रकाना सुद्धा टाकण्यात यावा जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना बाहेर विदयापीठ मध्ये प्रवेश घेण्यासाठी टक्केवारी ची गरज असते त्यामुळे त्याकरिता आकारण्यात येणारा 200/- वेगळा आर्थिक भुदंड लागणार होता सोबतच वेळेवर conversion सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे विलंब होऊन प्रवेशापासून वंचित राहावे लागतं होते. Gondwana University CGPA to percentage conversion
Also Read : शेतकऱ्यांचा तहसीलदार यांच्यावर रोष
युवासेना च्या वतीने हा मुद्दा बैठकीत ठेऊन यावर तोडगा म्हणून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मार्कशीट वरच CGPA सोबतच टक्केवारी सुद्धा नोंद करावी अशी मागणी प्रा निलेश बेलखेडे यांनी केली व यावर निर्णय घेऊन येत्या हिवाळी किंवा उन्हाळी पारीक्षे पासून विदयार्थ्यांना अश्या पद्धतीची मार्कशीट उपलब्ध करून देण्यावर कुलगुरू यांनी सकारात्मकता दाखवून निर्णय घेतला.
विविध विषयांवर चर्चा
यावेळी गोंडवाना अंतर्गत मॉडेल कॉलेज येथील अभ्याँगत प्राध्यापक (Visiting Faculty) यांचे 2023 -24 चे थकीत वेतन देण्यात यावे, Ph.विद्यार्थ्याचे नोटिफिकेशन लवकरात लवकर काढावे तसेच
त्त्यांचे सर्व प्रक्रिया पार पडलेल्या विद्यार्थ्यांच्या pending असलेल्या provsional degree लवकरात लवकर देण्यात यावी., विद्यापीठ अंतर्गत परीक्षा केंद्रात सुविधा आणि घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीमध्ये केंद्रात सुधारणा करण्यात याव्यात, विद्यापीठ परीक्षा विभागात होणाऱ्या दिरंगाई मुळे विद्यार्थी -शिक्षकांना होणाऱ्या विविध अडचणी.अश्या विविध विषयाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.
आमदार अडबाले यांनी विदयापीठ प्रशासनाला निर्देश देत समस्या निकाली काढण्यासंदर्भात सूचना केल्या यावर कुलगुरू तसेच इतर अधिकारी यांनी सकारात्मकता दाखविली व येत्या काही दिवसात सर्व विषय निकाली काढण्याचे आश्वासन दिले. सहकार्याबद्दल सिनेट सदस्य, विभागीय सचिव प्रा निलेश बेलखेडे यांनी आमदार आडबले सर यांचे तसेच कुलगुरू बोकारे, प्र.कुलगुरू कावळे आणि इतर अधिकारी यांचे आभार मानले.










